माणदेशी साहित्याचा डंका आता कर्नाटकात; विलासराव खरात यांच्या ‘आकुबा’ कथासंग्रहाचा होणार कन्नड भाषेत अनुवाद!ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. कुंभार करणार अनुवादन;
राज्यस्तरीय ‘गावगाडा पुरस्कारा’बद्दल आटपाडीत खरात यांचा ऐतिहासिक श्री कलेश्वर मंदिरात भव्य सत्कार विशेष प्रतिनिधी सांगली:ग्रामीण जीवन, लोकसंस्कृती आणि मातीतल्या माणसांच्या भावविश्वाला आपल्या लेखणीतून जिवंत करणारे आटपाडीचे ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते विलासराव खरात यांच्या ‘आकुबा आणि इतर कथा’ या प्रसिद्ध कथासंग्रहाने आता भाषिक सीमा ओलांडून शेजारच्या कर्नाटक राज्यात दिमाखात पाऊल ठेवले आहे. या गाजलेल्या कथासंग्रहाचा आता कन्नड भाषेमध्ये अनुवाद होणार असून, कर्नाटकचे ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री. जी. एस. कुंभार सर हे हा अनुवाद करणार आहेत.
या भाषांतरासाठी लेखक विलासराव खरात यांनी अधिकृत संमती आणि आभार पत्र दिले असून, यामुळे माणदेशी साहित्याचा सुवास आता दाही दिशांना पसरणार आहे.सन २०२५-२६ मध्ये प्रकाशित झालेल्या आणि सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक माननीय योगीराज वाघमारे यांनी परीक्षण केलेल्या या ‘आकुबा आणि इतर कथा’ या पुस्तकाची व्याप्ती यामुळे खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय आणि आंतरराजकीय झाली आहे.ऐतिहासिक कलेश्वर मंदिरात पुरस्काराचा गजरदरम्यान, या ‘आकुबा’ कथासंग्रहाला पुणे येथील राज्यस्तरीय ‘गावगाडा साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र साहित्य परिषद (मसापा) पुणे, शाखा आटपाडी आणि डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन समितीच्या वतीने आटपाडी येथील ऐतिहासिक श्री कलेश्वर मंदिर परिसरात विलासराव खरात यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला
.हा अभूतपूर्व सन्मान सोहळा मा. अमरसिंह देशमुख (बापूसाहेब) यांच्या शुभहस्ते, मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विलासराव खरात यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण वास्तव, माणुसकीची नाळ आणि गावगाड्याचे अस्सल चित्रण यामुळे ‘आकुबा’ या कथासंग्रहाने राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली असून, या साहित्यकृतीमुळे आटपाडीच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.साहित्य व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थितीया सोहळ्याला परिसरातील साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये प्रामुख्याने:श्री. दिनेश देशमुख (कार्यवाह, वाचन उपक्रम)श्री. सतीशराव भिंगे (सांगली जिल्हा कार्यवाह, ग्रंथकार संघ)श्री. व्ही. एन. देशमुख सर (माजी मुख्याध्यापक)प्रा. डॉ. विजय शिंदेश्री. दत्तात्रय कांबळे (अध्यक्ष, गणेश वाचनालय शेटफळे)यांच्यासह अरविंद चांडवले, वरीष्ठ साहित्यिक व जन्मशताब्दी समितीचे सरचिटणीस स्वतः विलासराव खरात, जयसिंग देशमुख सर, जया काका देशमुख, शिवाजीराव माळी, मिलिंद वाले, दीपक खरात सर, अरुण साळुंखे, सर्जेराव राक्षे, विलास कवडे, हणमंतराव राक्षे, नंदकुमार राक्षे, यशवंत मोटे, नामदेव मोटे आदी मान्यवर, ग्रामस्थ व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.’
आकुबा’ कथासंग्रहाला राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याबद्दल आणि आता थेट कन्नड भाषेत अनुवाद होऊन हे पुस्तक कर्नाटकात झळकणार असल्याबद्दल संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आणि सीमाभागातून विलासराव खरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


