मुंबई , कल्याण मटका लीक होत नाही, मग नीट पेपरच का फुटतो?भुषण बागुल यांचा सरकारवर घणाघात | विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा
त-हाडी प्रतिनिधीत-हाडी ,(दि.२४) – नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून ग्राम निष्ठा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष नेते भुषण माधव बाबुल यांनी सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर तीव्र टीका केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात निष्काळजीपणा आणि व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.परीक्षा सुरक्षेवर उपस्थित केले सवालभुषण माधव बाबुल म्हणाले, मुंबई कल्याण मटका हा अवैध धंदा असूनही तो लीक होत नाही, मात्र देशातील महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार कसे फुटतात? असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नीटसारख्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका छपाईपासून वितरणापर्यंत कठोर सुरक्षा आणि गोपनीयता पाळली जाते, तरीही पेपरफुटी घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवण्याची मागणीपेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचे बागुल यांनी सांगितले. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक वर्षानुवर्षे मेहनत व मोठा खर्च करतात; मात्र भ्रष्ट प्रवृत्ती आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास ढासळेल, असा इशाराही त्यांनी दिला. या वक्तव्यानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.


