यंदाचा राज्यस्तरीय 2026 “ आरोग्यदूत पुरस्कार ” श्री जितेंद्र पाटील यांना प्रदान
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना चा वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय 2026 “ आरोग्यदूत पुरस्कार “ जळगाव जिल्हा चे एरंडोलचे तालुकाचे श्री जितेंद्र पाटील : ‘आरोग्यम् धनसंपदा’ फाऊंडेशनच् अध्यक्ष हे कल्याण मुंबई येथे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचा माध्यमातून ठरले लाखो रुग्णांचा तारणहार, या सेवे मुळे श्री जितेंद्र पाटील यांना आरोग्यदूत पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे.
— ( एन्ट्रो )शारीरीक वेदनेने असह्य झालेल्या, आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या परिणामकारक मोफत उपचारासाठी मुंबईतील नामांकित खाजगी व शासकीय हॉस्पिटलपर्यंत पोहचविणारा हा रस्ता जणू देवदूताच्या सहवासातीलच. आरोग्याच्या सेवेत सर्मिपत एक निस्वार्थ यौद्धा व हजारो रूग्णांसाठी आशेचा किरण ठरलेला अद्वुत मानव म्हणजेच एरंडोलचे जितेंद्र केवलसिंग पाटील. वयाच्या चाळीशीतच आजवर दहावर्षाच्या सेवेत राज्यभरातील २७ लाखावर रुग्णांच्या मदतीला धावलेला.
३० हजारहून अधिक रुग्णांच्या मोफत विविध वैदकीय शस्त्रक्रियांच्या कार्यासाठी सतत कार्यशील असलेल्या या देवदूताचे कार्य, नाव आजवर कुठेही नोंदवले गेले नाही. पण या प्रत्येक रुग्णांच्या मनात नाव कोरले गेलेला हा खरा ‘आरोग्यदूत’. एरंडोल मधून नोंदणी झालेल्या ‘ आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन ’ या संस्थेच्या माध्यमातून कल्याण येथून त्यांचे हे कार्य सुरु आहे.महाराष्ट्रातून विविध आजारांचे रूग्ण दररोज मुंबई, ठाणे जिल्ह्यात उपचारासाठी जातात. यातील गरजू रुग्णांना आपल्या ‘आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन’च्या माध्यमातून विविध योजनेच्या व ट्रस्टच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम जितेंद्र पाटील निस्वार्थ सेवेने करीत आहेत. केवळ रूग्णालयात दाखल करणे नव्हे तर पुढील परिणामकारक उपचाराचे नियोजन करण्याचे कामही आवडीने करतात. . राज्यातील जिल्ह्यास विविध भागातून येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी मुंबई परिरातील खाजगी,शासकीय अशी विविध १०३ हॉस्पिटल उपलब्ध आहेत.
रुग्णांवर आवश्यक उपचार पद्धतीनुसार हॉस्पीटलची निवड केली जाते. वैदकीयक्षेत्रांमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, फरकट, आर्थिक पिळवणूक थांबावी व रुग्णांना तात्काळ योग्य उपचार मिळावे, या उद्देशाने या रुग्णसेवेच्या कार्यास सुरुवात केल्याचेही जितेंद्र पाटील अभिमानाने सांगतात.आरोग्यसेवेबरोबरच समाजकार्यातही गती :- शालेय जीवनापासूनच समाजकार्याची ही आवड असल्याने विविध समाजपयोगी कार्यातही पाटील यांनी आघाडी घेतली आहे. आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात रक्तदान शिबिरे, पूर्ण महाराष्ट्र मध्ये मोफत आरोग्य शिबीर. गरजूना शस्त्रक्रियांसाठी मदत, अनाथाश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, अपंगाना जयपूर फूट कॅलिपर, सायकलचे वाटप. रस्त्यावरील बेवारस रूग्णांना मदत व वैदकीय उपचार देण्याकामी त्यांचे मोठे योगदान आहे. कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या कामगारांना अन्नदान, औषधीचे वितरण, वेळप्रसंगी केलेली आर्थिक मदत ही त्यांचे दातृत्व सिद्ध करणारे आहे. आपले हे कार्य पुढेही सुरु ठेवत भविष्यात वृद्धांसाठी वृद्धाश्रम व अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जितेंद्र पाटील सांगतात.
या पुरस्कारांनी वाढविला सेवेचा उत्साह :- आंतरराष्ट्रीय संस्था रेड स्वस्तिक सोसायटी (मुंबई) यांचे कडून ‘ बेस्ट अचिवमेंट अवॉर्ड २०१८. भोपाल आंतरराष्ट्रीय ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड २०१९. कुवेत ‘ हुनर रत्न अवॉर्ड २०२१ . कुवेत आरोग्य दूत पुुरस्कार २०२४, सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आरोग्य भुषण पुरस्कार २०२५. असे 4 आंतरराष्टीय व 256 राष्टीय पुरस्कार या पुरस्कांनी आरोग्यसेवेच्या कार्याचा उत्साह वाढविल्याचे जितेंद्र पाटील अभिमानाने सांगतात.




