मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला बँकेचा खोडा..
सिव्हील खराब च्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्ज डाववले जाते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसापूर्वी बँकेने शेतकऱ्यांचे सिव्हील चेक करू नये. थकबाकी नसेल तर त्याला पुन्हा कर्ज द्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. याबाबत सोशल मीडियावर चायनल वर, न्यूज पेपर मध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे. या कर्जमाफी मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफ झाले आहे आणि बँकेचा कर्ज नील असलेला दाखलाही मिळत आहे. परंतु पुन्हा शेतकरी पीक कर्ज किंवा शेतीच्या विकासासाठी कर्ज घेण्यासाठी गेले असता त्या शेतकऱ्यांना तुमचे सिव्हींल खराब आहे म्हणून कर्ज डावलले जात आहे.
असा प्रकार झरे ता. आटपाडी येथील बँक ऑफ इंडिया येथील कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज मागणीसाठी कागदपत्रे गोळा केली त्यासाठी काही खर्च आला त्यानंतर बँक ऑफ इंडिया मध्ये कागदपत्रे सादर केल्यानंतर तुमचे सिव्हींल खराब आहे. म्हणून तुम्हाला पीक कर्ज डावले गेले असल्याचे सांगण्यात आले.अस प्रकार झरे परिसरामध्ये घडला आहे.
याबाबत अनेक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत आठ ते पंधरा दिवसांमध्ये बँकेने पीक कर्ज किंवा शेती कर्ज न दिल्यास झरे परिसरातील ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्ज डावले आहे. ते शेतकरी बँक ऑफ इंडियाच्या समोर आंदोलन करणार असल्याचे ज्यांना कर्ज मिळाले अशा शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया…
झरे येथील बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. तुमचे सिविल खराब आहे. असे सांगून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे . राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सिव्हिल पाहू नका त्यांना पीक कर्ज द्या असा आदेश बँकेला दिला असताना सुद्धा बँका शेतकऱ्यांची आदवणूक,पिळवणूक करतात. बँकेने आपला कारभार सुधारावा अन्यथा परिसरातील शेतकऱ्यासह बँक ऑफ इंडियाच्या समोर धरणे आंदोलन करावे लागेल.
मोहन खरजे… भाजप नेते
चौकट…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सिव्हींल पाहू नये असा आदेश दिला असताना सुद्धा अनेक बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज डावले जात आहे.




