• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम;

माणगंगा by माणगंगा
June 1, 2026
in Uncategorized
0
अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम;

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम;

एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित‘आई’ विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह; लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद12100 कविता, 115 जागतिक विक्रम, 3180 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 150 मानद डॉक्टरेटने साहित्यविश्‍वात निर्माण केली वेगळी ओळख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंदी आणि मराठी साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करत अहिल्यानगरचे सुपुत्र सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांनी जागतिक स्तरावर नवा इतिहास घडविला आहे.

एकाच दिवशी तब्बल 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदविला असून, ‘आई’ या विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची ऐतिहासिक कामगिरीही त्यांनी केली आहे.साहित्य, समाजकार्य आणि विक्रमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सीए शंकर अंदानी यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच भारतातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थांनी घेतली असून त्यांच्या कार्याची अधिकृत नोंद होणार आहे.‘मा की ममता मा अनेकता की शक्ति’ या नावाने प्रकाशित होत असलेल्या भव्य हिंदी काव्यसंग्रहात संपूर्ण भारतातील 140 कवींनी लिहिलेल्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

तब्बल 5121 कवितांचा हा संग्रह जगातील सर्वात मोठा मातृत्वविषयक हिंदी काव्यसंग्रह मानला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य संकलन आणि संपादनाचे कार्य आजवर जगात कुणीही केले नसल्याचा दावा करण्यात येत आहे.याचबरोबर सीए शंकर अंदानी यांनी स्वतः लिहिलेल्या एकूण 12100 कवितांचे विविध पुस्तकांमध्ये प्रकाशन होत असून, हा देखील एक जागतिक विक्रम ठरत आहे. साहित्यविश्‍वात सर्वाधिक कविता प्रकाशित करण्याचा मान देखील त्यांच्या नावावर नोंदविला जात आहे. मराठी साहित्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ‘वडील बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या नावाने महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1161 कवितांचे संकलन असलेला मराठी कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1161 कवितांचा स्वतंत्र संग्रह प्रकाशित केला जात आहे.या सर्व उपक्रमांमुळे एकाच दिवशी तब्बल पाच जागतिक विक्रम सीए शंकर अंदानी यांच्या नावावर नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर भव्य प्रकाशन सोहळा 30 मे 2026 रोजी पुणे येथे होणार असून, विविध क्षेत्रातील नामवंत राजकीय नेते, साहित्यिक, लेखक, कवी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.सीए शंकर अंदानी हे केवळ साहित्यिक नसून समाजसेवक म्हणूनही त्यांनी मोठे कार्य केले आहे.

अनेक मंदिरे, धर्मशाळा, सामाजिक संस्था, चर्च, मस्जिद तसेच विविध सामाजिक संघटनांचे आर्थिक व करसल्लागार कामकाज त्यांनी अत्यंत अल्प दरात किंवा विनामूल्य केले आहे. 2022 मध्ये त्यांनी 364 मंदिरे, मस्जिद, चर्च आणि सामाजिक संस्थांचे कामकाज केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली होती. याबाबतची माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था देशभरातील उल्लेखनीय कार्य आणि विक्रमांची काटेकोर तपासणी करूनच नोंद करते. अत्यंत मर्यादित व्यक्तींना या संस्थेकडून अधिकृत मान्यता दिली जाते. त्यामुळे सीए शंकर अंदानी यांच्या कार्याला मिळालेली ही दखल विशेष महत्त्वाची मानली जात आहे.सीए शंकर अंदानी यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. युनायटेड नेशन अमेरिका तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून त्यांना “मेडल ऑफ एक्सलन्स” हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल 3180 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नोंद असून, 115 जागतिक विक्रम आणि 150 मानद डॉक्टरेट मिळाल्या आहेत. व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले सीए शंकर अंदानी हे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे मागील 18 वर्षांपासून करसल्लागार म्हणून कार्यरत होते. तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेचे मागील 20 वर्षांपासून करसल्लागार म्हणून ते कार्य करत आहेत.

अनेक शासकीय संस्था, बँका आणि पतसंस्थांचे ते लेखापरीक्षक व करसल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, संगमनेरचे आ. सुधीर तांबे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, आमदार संग्राम अरुणकाका जगताप, अहमदनगर सिंधी समाज अध्यक्ष महेश मध्यान यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, सीए शंकर अंदानी यांना “डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2022” ने देखील गौरविण्यात आले आहे. डॉक्टर बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठान, नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातून आणि परदेशातून प्राप्त झालेल्या सुमारे 1000 अर्जांमधून केवळ 40 जणांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ट समाजसेवेबद्दल हा पुरस्कार 11 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये पद्मश्री जितेंद्र सिंग शनटी, भाजप राष्ट्रीय सचिव व खासदार दुष्यंत गौतम, दिल्ली पोलिसांचे एसपी तोमर आणि भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल राजीव भल्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. साहित्य, समाजकार्य, विक्रम आणि सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्यरत राहून सीए डॉ. प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांनी अहिल्यानगरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

Views: 8
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)