• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘शिक्कामोर्तब’ नाटकाच्या माध्यमातून लोकप्रिय अभिनेते ‘कांचन पगारे’ मजनू या ‘बंगाली’ भूमिकेतून उडवणार हास्याचे फवारे!

माणगंगा by माणगंगा
June 14, 2026
in Uncategorized
0
‘शिक्कामोर्तब’ नाटकाच्या माध्यमातून लोकप्रिय अभिनेते ‘कांचन पगारे’ मजनू या ‘बंगाली’ भूमिकेतून उडवणार हास्याचे फवारे!

‘शिक्कामोर्तब’ नाटकाच्या माध्यमातून लोकप्रिय अभिनेते ‘कांचन पगारे’ मजनू या ‘बंगाली’ भूमिकेतून उडवणार हास्याचे फवारे!

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे)

हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात, तसेच छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते कांचन पगारे आता एका नव्या दमाने रंगभूमीवर परतले आहेत. ‘तरंगिणी एंटरटेनमेंट’ आणि ‘नवनीत’ निर्मित, तसेच प्रमोद शेलार लिखित व दिग्दर्शित ‘शिक्कामोर्तब’ या नव्याकोऱ्या नाटकातून ते रसिक प्रेक्षकांना आपल्या प्रतिभेची एक वेगळीच जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नाटक ही कलाकाराच्या अभिनय क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. प्रसिद्धीपेक्षा कलेवरील निष्ठा आणि अभिनयातील प्रामाणिकपणा जपत, रंगभूमीशी पुन्हा घट्ट नाते जोडण्याचा कांचन पगारे यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

‘शिक्कामोर्तब’ या नाटकात त्यांनी एका मजनू ह्या ‘बंगाली’ माणसाची अत्यंत अफलातून आणि आव्हानात्मक भूमिका लीलया साकारली आहे. बंगाली धाटणीच्या मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि त्या भूमिकेची योग्य पकड घेण्यासाठी त्यांनी घेतलेली अपार मेहनत नाटकाच्या सादरीकरणात स्पष्टपणे दिसून येते. मजनू या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन ते जिवंत करण्याची त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. विनोदी प्रसंग असोत किंवा भावूक क्षण, त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकपणा प्रेक्षकांना भारावून टाकतो. या नाटकात कांचन पगारे यांच्यासह सागर कारंडे, स्नेहा पराडकर आणि भक्ती रत्नपारखी या दिग्गज कलाकारांची दमदार फळी आहे.

विशेषतः रंगमंचावर सागर कारंडे आणि कांचन पगारे यांची अभिनयातील ‘केमिस्ट्री’ आणि जुगलबंदी संपूर्ण नाटकात भाव खाऊन जाते. त्यांना स्नेहा पराडकर यांच्या करारी ‘वकिली’ची आणि भक्ती रत्नपारखी यांच्या ‘लैला’ या पात्राची उत्तम साथ लाभली आहे.एका जोडप्याच्या आयुष्यात अचानक आलेल्या दुसऱ्या जोडप्यामुळे निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून नात्यांवर अधिकृतरीत्या ‘शिक्कामोर्तब’ करणे किती गरजेचे असते, हा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत मांडून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. कांचन पगारे आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाला तांत्रिक बाजूची उत्तम जोड मिळाली आहे.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उभारलेले आलिशान घर, शीतल तळपदे यांची मोहवून टाकणारी प्रकाशयोजना आणि अभिजित पेंढारकर यांच्या सुमधुर संगीतामुळे नाटकाची रंगत अधिकच खुलते. नाटकाचे निर्मिती प्रमुख म्हणून महेंद्र खराडे उत्तम जबाबदारी सांभाळत आहेत. अभिनयाचा हा निखळ आनंद अनुभवण्यासाठी आणि कांचन पगारे यांच्या या नव्या व प्रेरणादायी नाट्यप्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी रसिक नक्कीच आतुर असतील. या नवीन नाट्यकृतीसाठी कांचन पगारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. ही कलाकृती नक्कीच यशाची शिखरे गाठेल आणि रसिक प्रेक्षक आपल्या प्रेमाचा ‘शिक्का’ या नाटकावर नक्कीच उमटवतील, अशी नटेश्वर चरणी प्रार्थना!

Views: 31
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

छोटे पक्ष विलीन झाल्याने काँग्रेसची ताकद वाढेल हा दावा चुकीचाच..!;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)