श्री संतोष पटकारे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च टाळून केले डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
श्री संतोष पटकारे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च टाळून डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप केले. जांभवली तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे संतोष पटकारे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब ३५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या पेन शैक्षणिक वाटप केले.
त्याप्रसंगी श्री प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ म्हणाले की, संतोष पटकारे यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.संतोष पटकारे हे प्रत्येक वर्षी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कै महादेव पटकारे प्रतिष्ठान चे वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शैक्षणिक साहित्य २५००० रुपयेचे स्व ता वाटप केले हे कौतुकास्पद आहे
प्रत्येकाने जर असा विचार केला तर नक्कीच समाजातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही. संतोष पटकारे यांचे आदर्श समाज बांधव यांनी घेतला पाहिजे. आपणं ज्या समाजात जन्माला आलो त्याच ऋण फेडणे अशक्य आहे. याप्रसंगी शेलु तालुका कर्जत येथे रामचंद्र पुकळे व शिवाजीराव दातीर आनंदराव कचरे यांचे कडे ४०मुलाचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी विठ्ठल आखाडे चंद्रकांत आखाडे चंद्रकांत हिरवे मारुती झोरे संतोष झोरे गौरव कोळापटे सुनील लांबोर लक्ष्मण आखाडे लक्ष्मण खरात बाळासाहेब गोरे मोहन हिरवे अश्विनी खरात, किसाबाई आखाडे रामदास आखाडे चिमीबाई खरात इत्यादी समाज बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.


