विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवणे
मुंबई: कांदिवली (प्रतिनिधी)
मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी आणि समाजाच्या शाश्वत प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या निस्पृह कर्तृत्वाचा आदर करणे, हे समाज म्हणून आमचे परमकर्तव्य आहे. याच उदात्त भावनेतून ‘शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान’ अविरतपणे कार्यरत आहे.
चालू वर्षातही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व मार्गदर्शक कार्य करणाऱ्या आदरणीय व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी प्रतिष्ठान सज्ज झाले असून, राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अत्यंत आदराने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.आपण किंवा आपल्या परिचयातील सुजाण व्यक्तीने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय/आरोग्य, कला, सांस्कृतिक, पर्यावरण, रोजगार निर्मिती, पत्रकारिता, कृषी, उद्योग, सहकार, लोकप्रतिनिधी किंवा महिला व युवा सशक्तीकरण या क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिले असल्यास आपले प्रस्ताव सादर करावेत. हे पुरस्कार वयाचे बंधन न ठेवता केवळ व्यक्तीच्या कर्तृत्वाला व समर्पणाला पाहून प्रदान केले जातात.
निवड झालेल्या सन्माननीय मान्यवरांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र सोबत श्रीफळ आणि स्नेहपुष्प देऊन अत्यंत सोहळापूर्वक सन्मानित करण्यात येईल. आपल्या प्रस्तावासोबत केवळ आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित (Attested) झेरॉक्स प्रती जोडाव्यात. (कृपया मूळ कागदपत्रे जोडू नयेत, तसेच सादर केलेली कागदपत्रे प्रतिष्ठानकडे जतन केली जातील, ती परत मिळणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी). प्रस्तावासोबत आपला सविस्तर परिचय (बायोडाटा), तसेच एक फोटो अर्जावर चिकटवून व एक फोटो सोबत जोडून पाठवावा. आपल्या कार्यास अधिक बळ देण्यासाठी पत्रकार, शिक्षक, मुख्याध्यापक, संपादक, सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारसपत्र जोडल्यास उत्तम, मात्र ते बंधनकारक नाही. पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या निवड समितीकडे सुरक्षित राहील.
आपले सन्माननीय प्रस्ताव स्वीकृत करण्याची अंतिम तारीख ५ जुलै (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे. सादर प्रस्तावासाठी प्रवेश सहकार्य शुल्क ₹ २,०००/- असून, ते मोबाईल क्रमांक 8898334580 वर व्हाट्सॲप किंवा स्कॅनिंग कोड/पेटीएमद्वारे सुलभतेने जमा करता येईल. निवड झालेल्या मान्यवरांना दूरध्वनी अथवा पत्राद्वारे अत्यंत आदराने कळविले जाईल.संपर्क व पत्रव्यवहाराचा पत्ता: ॲड.सुनील भार्गवराम शिर्के.,संस्थापक / अध्यक्ष: शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान: स्वप्न को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. १०७/३, सेक्टर-१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०० ०६७. भ्रमणध्वनी (WhatsApp): 8898334580 / 7738300157. ईमेल: shirkejankalyanpratishthan@gmail.com /sbshirke63@gmail.com धन्यवाद


