• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माझंही मत….समाजवाद्यांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वीकारार्हता मिळाली हा हास्यास्पद दावा.ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 2, 2026
in Uncategorized
0
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*माझंही मत….**समाजवाद्यांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वीकारार्हता मिळाली हा हास्यास्पद दावा*.ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.१९७७ पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय दृष्ट्या अस्पृश्य मानला जात होता. जनसामान्यांना तो स्वीकृत नव्हता. सामान्य कुटुंबातील आई-वडील आपल्या मुलांना संघात जाण्यापासून अडवत असत. मात्र १९७७ नंतर समाजवाद्यांमुळे संघाला स्वीकारार्हता मिळाली. मात्र त्यात समाजवादी पक्ष लयास गेला असा दावा अजेय पुनर्वसू नामक लेखकाने केलेला आहे.अजेय पुनर्वसू यांचा हा लेख फेसबुकवर माझ्या एका पत्रकार मित्राने पोस्ट केलेला वाचण्यात आला

. हे अजेय पुनर्वसू कोण याची चौकशी केली असता ख्यातनाम मराठी साहित्यिक आणि समाजवादी विचारांचे पत्रकार अनिरुद्ध पुनर्वसु म्हणजेच नारायण आठवले यांचे अजेय पुनर्वसू हे मानसपुत्र असल्याचे कळले. त्यामुळे ते देखील समाजवादी विचारसरणीचे आहेत अशी माहिती मिळाली. या लेखात पुढे असेही म्हटले आहे की जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांना सत्तेबाहेर करण्याच्या नादात संघ नेत्यांना जवळ घेतले आणि त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. जयप्रकाश नारायण यांच्या निधनानंतर अनेक समाजवादी नेते नंतर संघाच्या वळचणीला आले आणि त्यांनी आपले भले करून घेतले, असाही दावा पुनर्वसू यांनी या लेखात केला आहे. १९७७ पूर्वी संघाला काहीही सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. तो राजकीयदृष्ट्या अस्पृश्य होता आणि समाजवाद्यांमुळे संघाला प्रतिष्ठा मिळाली हे पुनर्वसू यांचे सर्व दावे काहीसे हास्यास्पद असेच वाटतात

. अर्थात याबाबत संघाची अधिकृत भूमिका मांडणारा मी संघाचा कोणताही पदाधिकारी किंवा प्रवक्ता नाही. मात्र एक पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक अभ्यासक या नात्याने मला जे काही अल्पस्वल्प ज्ञान आहे त्या आधारे मी माझे मुद्दे या लेखात मांडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकारणात कधीही सक्रिय झाला नव्हता. मात्र संघ विचाराच्या स्वयंसेवकांनी एकत्र येत स्थापन केलेला भारतीय जनसंघ हा राजकीयदृष्ट्या अस्पृश्य असता.

, तर १९६७-६८ च्या दरम्यान मध्यप्रदेश उत्तर प्रदेश अशा काही राज्यांमध्ये संयुक्त विधायक दलांच्या स्थापना झाल्या, त्यात जनसंघाच्या आमदारांना कधीच सहभागी करून घेता आले नसते. तेव्हापासूनच जनसंघ हा राजकारणात सक्रिय होता, आणि तिथे त्यांना कोणीही अस्पृश्य मानले नव्हते.संघाला राजकीय दृष्ट्या अस्पृश्य मानले गेले असते तर १९६२ च्या चीनच्या युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी संघाची मदत नागरी व्यवस्थापनासाठी कधीच घेतली नसती. १९६२ मध्ये युद्धाच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी नागरी व्यवस्थांमध्ये जी काही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती लक्षात घेत १९६३ च्या गणतंत्र दिनाच्या मुख्य पथसंचालनात नेहरूंनी संघ स्वयंसेवकांची एक पूर्ण वाहिनी सहभागी करून घेतली असती का?

अजेय पुनर्वसु यांना कदाचित याबाबत माहिती नसावी. संघ जनसामान्यांच्या दृष्टीने स्वीकृत नसता आणि तिरस्कृत राहिला असता तर दरवर्षी संघाच्या शाखा वाढत गेल्या नसत्या. त्याशिवाय १९५० मध्ये पहिली संघबंदी उठल्यावर संघाने फक्त आपले काम संघ स्थानावर मर्यादित न ठेवता समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत होण्यासाठी पावले उचलली होती. त्यात देखील त्यांना जनसामान्यांचा व्यापक पाठिंबा मिळाला. भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनसंघ, वनवासी कल्याण आश्रम, अशा विविध क्षेत्रांमध्ये संघ स्वयंसेवक सक्रिय झाले आणि जनसामान्यांनी देखील त्यांना तितकाच पाठिंबा दिला ही बाब त्या काळात देखील संघाला आणि संघ विचारांना स्वीकारार्हता होती हे अधोरेखित करते.

१९७१ मध्ये नागपूर जवळ खापरी येथे संघाचे एक भव्य असे शिबिर झाले होते. त्यात सुमारे दहा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. हे महा शिबिर बघण्यासाठी त्या तीन दिवसात त्यावेळी सुमारे दोन लाख नागरिक तिथे पोहोचले होते. संघाला स्वीकारार्हता होती म्हणूनच ही गर्दी झाली होती असे म्हणता येते ना. १९७५ पर्यंत देशात ज्या नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्ती आल्या, त्यावेळी जनसामान्यांना मदत करण्यासाठी संघ स्वयंसेवकच आघाडीवर राहत होते आणि जनता देखील त्यांना सहकार्य करत होती. ही बाब देखील संघाला समाजाने स्वीकारले होते हे स्पष्ट करते. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली आणि लगेचच संघावर बंदी घातली.

त्यानंतर संघाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना अटक केली. नंतर जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनानुसार आणीबाणीविरोधात संघर्ष करण्यासाठी जो सत्याग्रह सुरू झाला त्यात संघ स्वयंसेवक आघाडीवर होते. आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करून अटक करवून घेणाऱ्यांमध्ये संघ स्वयंसेवकांचा आकडा लक्षणीय होता. जर संघाला समाजात स्वीकारार्हता नसती, तर इतक्या मोठ्या संख्येत संघ स्वयंसेवक सत्याग्रहात सहभागी होऊ शकले असते का? तुरुंगाबाहेर देखील संघ स्वयंसेवकांनी समाजात गुप्तपणे काम करत आणीबाणीविरोधात महत्त्वाची भूमिका बजावली होती हे वास्तव देखील नाकारता येणार नाही. जयप्रकाश नारायण यांनी संघाला समाजवाद्यांच्या पदराखाली घेतले अशा आशयाचे विधान पुनर्वसु यांनी या लेखात केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे जयप्रकाश नारायण हे सर्वोदयी नेते होते. ते समाजवादी कधीच नव्हते. आणीबाणी लागताच जयप्रकाश नारायण यांना सर्वप्रथम अटक केली गेली होती. वर्षभराने त्यांची सुटका करण्यात आली. ज्यावेळी इंदिरा गांधींच्या दमनशाहीला उत्तर देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे ठरवले त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्यासोबत तत्कालीन जनसंघाचे सर्व नेते एकत्र आले होते आणि आणीबाणी ही लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटणारी असल्यामुळे संघ स्वयंसेवकांनी देखील या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच जयप्रकाश नारायण आणि संघ अधिकारी एकत्र आले होते. विशेषतः जयप्रकाश नारायण यांचे अगदी विश्वासू सहकारी नानाजी देशमुख हे देखील संघाचेच होते,

आणि त्यांनी जयप्रकाशजींसोबत इंदिरा गांधीविरोधी चळवळ पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आणीबाणी विरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये तत्कालीन समाजवादी पक्ष सक्रिय होता हे वास्तव कधीच नाकारले जाणार नाही. मात्र त्यापूर्वीपासूनच भारतातील समाजवादी चळवळ हळूहळू निष्प्रभ ठरू लागली होती. आधी एक समाजवादी पक्ष असलेले नंतर प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष अशा दोन पक्षात विभागले गेले होते. नंतर पुन्हा एकदा ते समाजवादी पक्ष या नावाने एकत्रही आले होते. आणीबाणी नंतर समाजवादी पक्ष हा जनता पक्षात विलीन झाला होता. मात्र जनता पक्षाची वाट लावण्यात आणि जनता पक्षाचे सरकार पाडण्यात समाजवादीच जास्त सक्रिय होते असे इतिहास सांगतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात समाजवादी नेते जनता पक्ष सोडून लोक दलात सहभागी झाले होते. त्याला कारण त्यांचा जनसंघातील जुन्या मंडळींना असलेला विरोध हेच होते.

त्यामुळे जनता पक्षातून जुने जनसंघाचे लोक बाहेर निघत भारतीय जनता पक्ष स्थापन झाला आणि तो आज राष्ट्रव्यापी पक्ष बनला आहे. गेल्या बारा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे देशात सरकार आहे, तर अर्ध्या अधिक राज्यांमध्ये देखील भाजपचीच सरकारे आहेत. तर जनता पक्ष किंवा नंतर १९८८-८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह आणि चंद्रशेखर या मंडळींनी स्थापन केलेले जनता दल याचे अस्तित्व आज कुठेही नाही. जुने समाजवादी आज वेगवेगळ्या पक्षात पोहोचलेले आहेत, तर समाजवादी पक्ष नामक एक गट उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात धडपड करताना दिसतो आहे. हे बघता समाजवादी पक्ष संपला तो त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यात संघाचा काही दोष असल्याचे मला तरी कुठे जाणवलेले नाही. त्याचवेळी समाजवादी नेत्यांनी भाजपमध्ये येऊन किंवा संघाला जवळ करून स्वतःचे भले करून घेतले असेही कुठे दिसून आलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुरुवातीपासूनच जन समर्थन मिळू लागले होते. ते हळूहळू वाढतच गेले होते. पहिल्या संघबंदीनंतर संघाने समाजाच्या सर्वच क्षेत्रात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार संघ विस्तार होत गेला. त्याला समाजवादी कुबड्यांची कधीच गरज नव्हती. संघ स्वबळावर वाढला आणि आज संघाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. त्या तुलनेत त्याच काळात उदयाला आलेले इतर राजकीय पक्ष आणि राजकीय चळवळी या आज नामशेष तरी झाले आहेत किंवा मग आचके तरी देताना दिसत आहेत. तरीही अजेय पुनर्वसू यांनी त्यांच्या लेखात संघ विषयक दावे केलेलेच आहेत.

अर्थात लोकशाहीत त्यांची मते मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र तरीही मला ज्ञात असलेली दुसरी बाजू मांडण्याचा मी हा प्रयत्न केला आहे. अर्थात हे माझे मत आहे……तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही निश्चित मांडू शकता…..त्याचे स्वागतच आहे.

Views: 44
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गोंदवलेच्या मुख्य चौकातील धोकादायक झाडामुळे अपघाताचा धोका;आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तातडीने फांद्या छाटण्याची मागणी

गोंदवलेच्या मुख्य चौकातील धोकादायक झाडामुळे अपघाताचा धोका;आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तातडीने फांद्या छाटण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)