*आटपाडीत ११ जुलै रोजी साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात यांना अभिवादन सभा; मान्यवरांची उपस्थिती*
आटपाडी | प्रतिनिधीसाहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी (जि. सांगली) यांच्या वतीने थोर साहित्यिक, समाजप्रबोधनकार आणि विचारवंत डॉ. शंकरराव खरात यांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूत गिरणी, आटपाडी’ येथे पार पडणार आहे
. या विशेष अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी मा. राजेंद्र अण्णा देशमुख भूषवणार आहेत.विचारांचा जागर आणि आदरांजलीडॉ. शंकरराव खरात यांनी आपल्या लेखनातून आणि सामाजिक कार्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या याच अथांग साहित्य, सामाजिक कार्य आणि पुरोगामी विचारांचा जागर करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन”तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच आटपाडी परिसरातील तमाम गावकरी बंधू-भगिनींनी या अभिवादन सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”— आयु. विलास खरात (सचिव, साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान, आटपाडी)


