*श्री संत सेना महाराज नाभिक समाजाची पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब सैंदाणे यांच्या तैलचित्राचे अनावरण*
*चाळीसगाव* : श्री संत सेना महाराज नाभिक समाजाची पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब हिरामण झंगा सैंदाणे यांच्या तैलचित्राचे अनावरण नुकतेच संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. नाभिक समाजाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीभाऊ बहाळकर, चाळीसगाव नगरपालिकेचे नगरसेवक अभयदादा वाघ गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर चंद्रशेखर बोरसे आणि चाळीसगाव समाजाचे उपाध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या हस्ते फोटोचे अनावरण झाले.
यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर सैंदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. कै. बापूसाहेब सैंदाणे यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा त्यांनी यावेळी गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष अहिरे यांनी केले.या कार्यक्रमाला विलास निकम, योगेश महाले, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश महाले, संचालक मंडळातील लोटन सोनवणे, भिकन बागुल, अशोक चित्ते, गोरख गोफने, शाम अहिरे, प्रवीण अहिरे, सुभाष महाले, मंगलाबाई अहिरे, कल्पनाबाई सैंदाणे, व्यवस्थापक विजय मोरे तसेच कर्मचारी आबासाहेब सैंदाणे आणि रेखाबाई वाडेकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चेअरमन शंकर सैंदाणे यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. व शाम अहिरे यांनी अनुमोदन दिले


