• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….सोनियाजींच्या कारखाली येऊन वाचलेली महिला…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 8, 2026
in Uncategorized
0
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर….सोनियाजींच्या कारखाली येऊन वाचलेली महिला…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.दररोज खूप सार्‍या घटना घडतात आणि त्या घटनांना साक्षीदार देखील अनेक असतात. मात्र एखाद्या घटनेला एखादाच कोणी साक्षीदार असतो आणि जगाच्या दृष्टीने ती बातमी महत्त्वाची असते. त्यावेळी मग त्या साक्षीदाराचा रोल फार महत्त्वाचा ठरत असतो.

पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना जेव्हा पत्रकारितेचे आणि बातमीचे मूळ तत्व शिकवले जाते, तेव्हा सांगितले जाते,की कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. अशी आगळीवेगळी काही बातमी घडली तर त्या बातमीचे महत्त्व खूप काही असते. देशभरात वेगवेगळ्या रस्त्यांवर वेगवेगळे अपघात दररोज नव्हे दर तासाला घडत असतात. कोणत्यातरी चार चाकी गाडीच्या खाली कुणीतरी माणूस येतो. एखादा जखमी होतो एखादा मरतो तर बाकी वाचतात देखील. लोक बघतात, थोडे हळहळतात आणि विसरून जातात. मात्र अशा प्रकारात ती चार चाकी कोणीतरी सामान्य माणसाची असते.

मात्र तीच चारचाकी राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांची असली तर, मग ती ब्रेकिंग न्यूज बनतेच. अशाच एका ब्रेकिंग न्यूज चे साक्षीदार बनण्याचा योग माझ्या आयुष्यात एकदा आला होता. १९९९ च्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर २००४ च्या ऑक्टोबर महिन्यात लोकसभा निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी फिलगुड चा मुद्दा पुढे करत सहा महिने आधी म्हणजे एप्रिल २००४ मध्येच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मग देशात निवडणुकांचे वारे वाहणे सुरू झाले.

१९९८ ते २००४ काँग्रेस सत्तेबाहेर होती. त्यामुळे काँग्रेसला आता कसेही करून पुन्हा सत्तेत यायचे हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी मग काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरात रोड शो आयोजित केला होता. या रोड शो साठी त्या एकेक गाव करत पुढे जात होत्या.सोनिया गांधी त्या दिवशी वर्धेहून वर्धा नागपूर मार्गानेच बुटीबोरी खापरी करत दुपारी चार ते पाच च्या दरम्यान नागपुरात प्रवेश करणार होत्या. नागपुरात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होणार होते.

नागपूर विमानतळापाशी त्यांचे स्वागत झाल्यानंतर त्या सरळ पुढे वर्धा मार्गानेच छत्रपती चौकात पोहोचल्या आणि तिथून त्या रिंग रोडने तुकडोजी पुतळा चौकाकडे जाणार होत्या. छत्रपती चौकात सोनिया गांधींचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना बघण्यासाठी नागरिकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. मी देखील छत्रपती चौकातच वृत्त संकलन करण्यासाठी थांबलो होतो. त्यावेळी त्या चौकात विविध वृत्तपत्रांचे छायाचित्रकार उपस्थित होते खरे, मात्र पत्रकार मी एकटाच होतो.ठरल्याप्रमाणे वर्धा मार्गाने सोनिया गांधींचा ताफा छत्रपती चौकात पोहोचला आणि उजव्या हाताला वळून रिंग रोड वरून पुढे निघाला.

चौकातून ताफा वळत असताना सोनियाजी कारच्या उघड्या दरवाज्यात उभ्या राहून उपस्थित जरा समुदायाला हात दाखवून अभिवादन करत होत्या. त्यांच्या मागेपुढे सुरक्षा रक्षक धावत होते. उपस्थित नागरिक सोनियाजींचा जयजयकार करत होते आणि सोनियाजी स्मितहास्याने त्यांना प्रतिसाद देत होत्या.सोनियाजींची गाडी छत्रपती चौकातून वळली आणि साधारणतः शंभर फूट अंतरावर बाजूच्या एका गल्लीतून त्यांच्या स्वागतासाठी एक जत्था पुढे आला.

अचानक काय गडबड झाली कोणास ठाऊक, पण त्यांना हार घालण्यासाठी पुढे आलेली एक महिला कार्यकर्ती कोणीतरी मागून धक्का दिल्याने रस्त्यावर पडली आणि तीही नेमकी सोनियाजींच्या गाडी समोरच. लगेच आरडाओरड झाली. सोनियाजींच्या गाडीचा चालक असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत करकचून ब्रेक मारला. तोवर त्या महिलेच्या अंगाला त्या चार चाकी चे समोरचे टायर्स चिकटले होतेच. गाडी थांबताच कार्यकर्ते धावले. घटनास्थळी असलेले पोलीस देखील तिथे धावले. त्या महिलेला उचलून लगेचच दवाखान्यात नेण्याची सोय केली गेली. काय झाले म्हणून सोनियाजींनी पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली आणि क्षणार्धात त्यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघाला. मी घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटून ती महिला कोण होती, काय होती,

याची सविस्तर माहिती घेतली आणि स्कूटरला किक मारून दुसऱ्या रस्त्याने सकरदरा चौकाकडे जायला निघालो. सक्करदारा चौकात सोनियाजी थोडावेळ थांबणार होत्या आणि उपस्थितांशी संवादही साधणार होत्या. सोनियाजींच्या गाडीखाली काँग्रेसची एक महिला कार्यकर्ते आली होती. मात्र सुदैवाने ती वाचली आणि किरकोळ खरचटण्यापलीकडे काही झाले नाही ही बातमी एव्हाना वाऱ्यासारखी सर्वदूर पसरली होती. उपस्थित वृत्त छायाचित्रकारांनी आपापल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना ही बातमी कळवली होती आणि घटनास्थळी अविनाशजी पाठक होते आणि त्यांनी सविस्तर माहिती घेतली हे देखील कळवले होते. मला याची काहीच कल्पना नव्हती. सोनियाजींचा ताफा जाणार असलेला मार्ग सोडून मी दुसऱ्या मार्गाने सक्करदरा चौकात जाण्यासाठी निघालो. रस्त्यात माझा एक सहकारी पत्रकार मित्र अनिल मोहरील भेटला. आमच्या थोड्याफार हवा पाण्याच्या गप्पा झाल्या आणि मी सक्करदरा चौकाकडे निघालो.

सक्करदरा चौकात पोहोचल्यावर सुरक्षित जागा पाहून मी स्कूटर ठेवली आणि गर्दीत शिरलो, तर तिथे उपस्थित असलेले सगळे पत्रकार मित्र माझी वाटच बघत होते. प्रत्येकाने मला बघताच छत्रपती चौकात नेमके काय घडले, कोणाचा अपघात झाला, कुणी जखमी झाले का आणि सोनियाजींची काय प्रतिक्रिया होती याची माहिती विचारणे सुरू केले. एकेकाला उत्तर देत असतानाच तितक्यात सोनियाजींचा ताफा येत असल्याची माहिती मिळाली. आम्ही लगेच सर्वजण तिकडे धावलो. सोनियाजींचा ताफा पुढे कळमन्याकडे रवाना झाल्यावर आम्ही सर्वच पत्रकार मित्र आपापल्या गाड्या काढून निघालो. मी तिथून थेट लक्ष्मी नगर मध्ये माझ्या कार्यालयात पोहोचलो आणि सोनियाजींच्या रोड शो ची बातमी लिहायला सुरुवात केली. मात्र एकामागे एक येणाऱ्या फोन्समुळे मला बातमी लिहिणे कठीण झाले होते. लँडलाईन वरचा फोन ठेवला की मोबाईलचा फोन वाजून तयारच असायचा. एक एक करत सर्व स्थानिक पत्रकार मित्रांना मी घडलेल्या घटनेची माहिती देत होतो. परिणामी मला बातमी लिहिणे कठीण झाले होते.

स्थानिक पत्रकार मित्र आटोत होतेच, तो यु एन आय चे नागेश गजभिये आणि देशोन्नतीचे आनंद भिसे येऊन पोहोचले. त्यांना बातमी सांगत असतानाच पी टी आय मधून फोन आला. त्या पाठोपाठ मग टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस सर्वांचे फोन सुरू झाले. रात्री साडेसात वाजले होते तरी माझे बातमी झाले नव्हते. विशेष म्हणजे फोन करून विचारणारे सर्व माझे मित्रच होते वेळोवेळी त्यांचीही मला मदत मिळत होती त्यामुळे कुणालाच नाही म्हणणे शक्य नव्हते.एव्हाना ही बातमी काही वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणूनही दाखवायला सुरुवात केली होती. साडेसातच्या सुमाराला मला दैनिक पुढारी च्या कोल्हापूर कार्यालयातून फोन आला आणि ही बातमी कधी देणार म्हणून विचारणा झाली. त्यावेळी मी दोन-तीन वृत्तपत्रांसाठी बातम्या देत असे. त्यांचेही फोन येणे सुरू झाले. शेवटी काही वेळ लँडलाईन चा रिसीवर काढून ठेवला आणि मोबाईल स्विच ऑफ केला तेव्हाच मी ती बातमी लिहून पूर्ण करू शकलो होतो. त्यावेळी इंटरनेटचा प्रसार आज सारखा नव्हता. परिणामी बातम्या फॅक्सने पाठवाव्या लागायच्या. मी माझा लँडलाईन चा रिसीवर काढून ठेवला, तर काही मित्रांनी फॅक्सच्या फोनवर देखील फोन करणे सुरू केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून मी बातमी पूर्ण केली आणि फॅक्स केला. नंतरच इतरांचे फोन घेणे सुरू केले.

त्या रात्री जवळजवळ साडेदहापर्यंत मी नागपुरातल्या आणि बाहेरच्या सर्व पत्रकार मित्रांना फोनवर नेमके काय घडले त्याची माहिती देत होतो. परिणामी दुसऱ्या दिवशी ती बातमी ऑल इंडिया न्यूज बनली होती. सोनियाजींच्या रोड शोला जितके महत्त्व आले नव्हते, तितके महत्त्व त्यांच्या गाडीखाली एक महिला आली आणि ती मरता मरता वाचली हीच बातमी खरी महत्त्वाची ठरली होती. पत्रकारिता करताना रोज वेगवेगळ्या बातम्यांना सामोरे जावे लागते.

मात्र एखाद्या दिवशी एखादी बातमी अशी काही घडून जाते की ती कायम लक्षात राहते. तुमच्या तर राहतेच पण इतरांच्या दृष्टीने देखील ती महत्त्वाची ठरलेली असते. वर सांगितलेली घटना देखील अशीच एक महत्त्वाची घटना ठरली होती आणि ती कायम माझ्या लक्षात राहिली आहे.

Views: 49
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो *तुकाराम मुंडे यांना उच्च न्यायालयाची चपराक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)