• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, July 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पटतेय का बघा….महिला पशुवैद्यक अधिकारी प्रियल चौरागडे यांचे धाडस…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 12, 2026
in Uncategorized
0
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*पटतेय का बघा….**महिला पशुवैद्यक अधिकारी प्रियल चौरागडे यांचे धाडस…*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.”हम भारत की नारी है, फूल नही चिंगारी है” ही घोषणा देणाऱ्या भारतीय महिला आपण जागोजागी पाहिल्या आहेत.

भारतीय महिलांनी आजवर आपण किती सक्षम आहोत हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. याच देशात स्वातंत्र्यासाठी पोटचे मूल पाठीला बांधून तटावरून घोडा फेकणाऱ्या झाशीच्या राणीची मर्दानगी आपण पाहिली आहे. तर अगदी आजच्या काळात अंतराळात जाऊन भारतीय महिलेचे कर्तृत्व दाखवणाऱ्या महिला देखील आपण पाहिलेल्या आहेत.

अशाच प्रकारे नरभक्षक वाघाला पिंजऱ्यात शिरूर जेरबंद करण्याचे धाडस एका महिला पशुवैद्यक अधिकाऱ्याने दाखवले आहे. त्याचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेडजवळच्या करांडला अभयारण्यात वेलतुर खेड्यात एक नरभक्षी वाघ अक्षरशः आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांसाठी कर्दनकाळ बनला होता. त्याला पकडण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू होते. मात्र ते यशस्वी होतं नव्हते.

शेवटी वन अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे मचानावर बसून वाघाला जेरबंद करण्याऐवजी वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. विद्यमान कायद्यानुसार वाघाला सहजी ठार मारता येत नाही. तसेच झाले तर वन्यजीव रक्षक प्रचंड आरडाओरडा करतात. प्रसंगी वन अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले जाते, त्यांची नोकरी देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वन अधिकारी देखील डायरेक्ट ॲक्शन ला घाबरतात. त्यामुळे या वाघाचा जीव न घेता त्याला जेरबंद करणे ही वन अधिकाऱ्यांसमोर आव्हान होते.

गेल्या आठवड्यात एका मध्यरात्री वन अधिकाऱ्यांनी वेगळीच योजना आखली. जंगलात ठेवलेल्या वाघाच्या पिंजऱ्यात दोन जिवंत माणसांना बसवले. त्यात एक होत्या तिथल्याच वनविभागाच्या पशुवैद्यक अधिकारी प्रियल चौरागडे आणि दुसरे होते वनरक्षक प्रतीक घाटे. मध्यरात्री जंगलात पिंजरा ठेवला गेला. त्याच परिसरात फिरत असलेला वाघ बिचकू नये म्हणून वाहन बाजूला ठेवून वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पायी चालत गेले. पिंजऱ्याजवळच एक भक्ष्य ठेवले गेले आणि पिंजऱ्यात पशुवैद्यक अधिकारी प्रियल चौरागडे आणि प्रतीक घाटे चुपचाप जाऊन अंधारात बसले.

या दोघांनीही जबरदस्त धोका पत्करला होता. अक्षरशः जीवावर उदार होऊन ते दोघेही पिंजऱ्यात जाऊन बसले होते. कुठल्याही क्षणी वाघ घेऊन त्यांच्यावर झडप घालू शकला असता. मात्र देवाचे नाव घेत ते दोघेही पिंजऱ्यात बसले होते. गर्द अंधारात हे दोघे बसले असतानाच अचानक पाऊस सुरू झाला. तितक्यात वाघ भक्ष्याच्या वासाने पिंजराजवळ येऊन पोहोचला. मात्र पाऊस सुरू असल्याने आडोसा शोधत तो पिंजऱ्यात शिरला.

यावेळी प्रसंगावधान राखत डॉ. प्रियल चौरागडे यांनी हातातल्या पिस्तुलाने वाघावर डायरेक्ट डार्ट मारला. त्या डार्टने वाघ बेशुद्ध झाला. वाघ बेशुद्ध होताच चौरागडे यांनी मोबाईलवर इतर सहकारी मित्रांना कळवले. लगेच सर्व सहकारी धावून आले आणि जेरबंद वाघाला ट्रांझिट हॉस्पिटलमध्ये नेले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. इथे डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या देशात पोटचे मूल रडत असेल म्हणून गडावरून उडी मारणारी हिरकणी आपण बघितली आहे.

मात्र जनसामान्यांचा जीव वाचावा म्हणून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन जीव धोक्यात घालणारी प्रियाल चौरागडे एखादीच असावी.धाडसी प्रियल चौरागडे यांचे खरोखरी कौतुक व्हायला हवे. त्यांना शासनाने तर पुरस्कृत करायला हवेच, पण समाजाने देखील त्यांचे पुढे येऊन कौतुक करायला हवे. त्यातून अनेक नव्या प्रिया चौरागडे घडतील. त्यासाठी नव्या पिढीला प्रेरणा मिळेल हे निश्चित.

Views: 28
Share

Related Posts

Uncategorized

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  

July 16, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 16, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 15, 2026
पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम
Uncategorized

पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

July 14, 2026
बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड
Uncategorized

बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड

July 14, 2026
तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!
Uncategorized

तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

July 14, 2026
Next Post
सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.

सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  
  • आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)