*सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.*
मिरजगाव: (प्रतिनिधी) येथील संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालयात पंढरपूरला जाणाऱ्या नाशिक येथील सायकल दिंडीचे स्वागत करण्यात आले. सदगुरु कृषी महाविद्यालय हे अहिल्यानगर-सोलापूर महामार्ग असल्याकारणाने पंढरपूरला जाणाऱ्या बहुतेक दिंड्या महाविद्यालयामध्ये थांबा घेतात. त्यांच्या सेवेची संधी महाविद्यालयाला लाभत असते.
त्यातील पहिली दिंडी ही नाशिक ते पंढरपूर सायकलवर जाणारी असते. दरवर्षीप्रमाणे नाशिक येथून पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या या सायकल दिंडीने सदगुरु कृषी महाविद्यालयात थांबा घेतला होता. सायकल दिंडीतील भाविक भक्तांनी प्रदूषण मुक्त वारीचा आदर्श घालण्याबरोबरच महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणही केले. यावेळी महाविद्यालयाकडून सर्व भाविक भक्तांच्या चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे आणि संचालक श्री सिद्धांत नेवसे यांनी यावेळी स्वतः उपस्थित राहून विठुरायाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
त्यातून त्यांची समाजकार्याबरोबरच अध्यात्माची आवड नेहमीच जाणवते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा सौ कल्याणी ताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, प्रगतशील शेतकरी सदाबापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपण करण्यात आले. विशेष करून नारळ व कापूर वृक्ष लागवड करण्यात आली. अध्यक्ष डॉ शंकरराव नेवसे यांनी यावेळी माणसाने नेहमी व्यायाम, योग, केले पाहिजे.
तसेच प्रदूषण मुक्त जीवन, इंधन बचत आणि पर्यावरण पूरक योजनांचा अवलंब करून निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला दिला.यावेळी संस्थेचे सचिव ह.भ.प.श्री राजेंद्रजी गोरे महाराज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते.





