वैभव पोरे व रोटरी क्लबचे काम सर्वांना दिशादर्शक – नितिन दोशी
म्हसवड-प्रतिनीधी
रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट यांचे मार्फत विरकरवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूला व म्हसवड येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूला डिजिटल क्लासरूम साठी लागणारा स्मार्ट एलईडी शाळेस भेट देवून खर्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना डिजीटल शिक्षण देऊन,दिशा देण्याचे काम वैभव पोरे करीत असल्याचे मत म्हसवड नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी व्यक्त केले.
ते विरकरवाडी येथे नवीन डीजीटल क्लासरूमच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी रोटरी क्लबचे समन्वयक वैभव पोरे,म्हसवड नगरपालीकेचे माजी उपनगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी,माजी नगरसेवक कैलास भोरे, मुख्याध्यापक सी.एम.कोकरे, जी.डी.मासाळ, पत्रकार एल.के.सरतापे,महेश कांबळे,लुनेश विरकर,सुशिल त्रिगुणे आदीसह शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा स्मार्ट एलईडी हा एक लाख पंचवीस हजार रुपए किंमतीचा असून त्या मध्ये सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम लोड करून आनंददायी शिक्षणाच्या सर्व पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.एवढ्या किंमतीचा हा डिजीटल क्लासरूम शाळेला फक्त पंचवीस हजार रुपए मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.यातील काही रक्कम सह्याद्री इंडस्ट्रीज,रोटरी क्लब पुणे व वैभव पोरे साहेब यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ वैभव पोरे अशा तिघांच्या माध्यमातून ही रक्कम वैभव पोरे साहेब यांनी उभा केली आहे.
त्यामुळेच एक लाख पंचवीस हजार रुपयांचा डिजीटल क्लासरूम फक्त शाळांना पंचवीस हजार रुपयातच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यामध्ये विरकरवाडी हायस्कूलचे पंचवीस हजार रूपए शाळेच्या सहशिक्षिका सौ.संध्या विरकर (जानकर मॅडम) यांनी देवू केले.तर वळई हायस्कूलचे पंचवीस हजार रूपये म्हसवड हायस्कूलचे सहशिक्षक आर.टी.काळेल यांनी देवू केले.वैयक्तीक पंचवीस हजार रुपए शाळेला डिजीटल क्लासरूमसाठी दिल्याबद्दल सौ.संध्या विरकर व श्री.आर.टी.काळेल यांचे मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचदरम्यान पोरे यांनी विरकरवाडी हायस्कूलच्या हाॅल,चार वर्ग खोल्या,व्हरांडा,आदीसाठी लागणारी सर्व फरशी देण्याचे पोरे साहेबांनी शब्द दिला. त्यावेळी त्यांनी विरकरवाडी व म्हसवड हायस्कूला प्रत्येकी पाच हजार किमतीची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली.
एकूणच वैभव पोरे यांनी रोटरी क्लब पुणे यांच्या माध्यमातून म्हसवडसह माण तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासाठी यापूर्वीच कोट्यावधीची मदत केली आहे.एकूणच त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक व आदर्शवत असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक ए.डी.जाधव यांनी केले तर आभार लुनेश विरकर यांनी मानले.
फोटो:
म्हसवड: येथील डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन करताना वैभव पोरे,नितिन दोशी,युवराज सुर्यवंशी आदी मान्यवर.



