• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन- शिक्षक दिन —– संजय सावंत यांचा लेख

माणगंगा by माणगंगा
September 5, 2021
in महाराष्ट्र
0
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन- शिक्षक दिन —– संजय सावंत यांचा लेख

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन-
शिक्षक दिन
—–संजय सावंत यांचा लेख


प्रज्ञावंत, ज्ञानयोगी ,आदर्श शिक्षक, शुद्ध आचरणकर्ता, तत्पर व्यक्तिमत्व, आदर्श राजकारणी ,शिस्तप्रिय प्रशासक, आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक इत्यादी गुणांनी ओळखले जाणारे प्रभावी व्यक्तिमत्व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1877 रोजी तिरोताणी तीर्थक्षेत्री झाला .त्यांच्या वडिलांचे नाव वीरस्वामी तर आईचे नाव सिताम्मा होते. राधाकृष्णन यांच्या पूर्वजांचे आंध्र प्रदेशातील एक सर्वपल्ली छोटेसे गाव त्यांचे वडील एका जमीनदाराच्या पदरी लेखनिकाचे काम करत असत. राधाकृष्णन यांचे पूर्वप्राथमिक शिक्षण तिरोताणीच्या प्राथमिक शाळेत झाले .या शाळेत प्रत्येक वर्षी पहिल्या नंबर मे ते पास होत गेले त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना तिरुपती येथे ल्युथर मिशन स्कूलमध्ये घातले सन 1903 मध्ये राधाकृष्णन मॅट्रिक पास विशेष गुण मिळवून झाले मिशनरी स्कूलमध्ये हिंदू धर्म कमी लेखले जात असे त्यामुळे राधाकृष्णन यांचा विरस होत असे परंतु शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही अभ्यासावर लक्ष केंद्रित केले त्यावेळी स्वामी विवेकानंदांना जगात खूप लोकप्रियता मिळत


होती ही वार्ता त्यांच्या कानी पडली म्हणून जिद्दीने भारतीय तत्वज्ञान भारतीय संस्कृती यांचा अभ्यास करण्याचा पक्का निर्धार त्यांनी केला.
वेलोर येथील व्हुरिस कॉलेजात शिक्षणासाठी दाखल झाल्यावर बी. ए. ला त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेतला. आणि प्रथम श्रेणीत पास झाले ते सतत वाचन आणि चिंतन करत असत एकांतप्रिय व ध्यानमग्न होऊन चिंतनात गढून जायचे पुस्तकाची त्यांची मैत्री होती इंग्रजी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते तसेच मोठ्या तज्ञ व बुद्धिमान लोकांबरोबर ते संवाद साधायचे पुढे मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये एम.ए. झाले त्या वेळी एक प्रबंध लिहावा लागे म्हणून त्यांनी “वेदांतातील नीतिशास्त्र “हा प्रबंध लिहून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले परीक्षक डॉ.ए.जी.हाँग यांनी प्रबंधाला उत्कृष्ट अभिप्राय दिला त्यावेळी राधाकृष्णन यांचे वय अवघे 20 वर्षांचे होते. त्यांनी बायबल , कुराण ,व गीता या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता.


मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली तेथे आदर्श विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून नावारूपाला आले तत्वज्ञान सारखा वृक्ष विषय जटिल आणि गंभीर विषय सोप्या भाषेत शिकवण्याची त्यांचे कौशल्य अद्वितीय होते त्यांना विविध परदेशी विद्यापीठात व्याख्यानांसाठी बोलावले जाऊ लागले पुन्हा मैसूर विद्यापीठात 1998 सली ते सेवेत रुजू झाले तेथे त्यांनी रीजन ऑफ रिलिजन इन कांँन्टेपररी हा ग्रंथ लिहिला इंग्लंड अमेरिका येथील विद्यापीठात या ग्रंथांवर त्यांचे चर्चासत्रे झाली
तत्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना अतुलनीय कीर्ती मिळाली पुणे कोलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञान विषयाची प्राध्यापक म्हणून काम केले ते तेही गप्प बसले नाहीत तर भारतीय तत्वज्ञान हा अजोड ग्रंथराज लिहिला त्यांच्या लिखाणाची प्रसिद्धी जगभर होऊ लागली म्हणून गाजलेल्या ऑक्सफोर्ड व केंब्रिज विद्यापीठात त्यांना व्याख्यानांसाठी बोलावले जाऊ लागली इंग्लंडच्या पंतप्रधान आणि अंथनी ईडन यांनी एका सभेत सर्वपल्लीचे भाषण वर बोलताना म्हटले नांगरलेल्या शेतातून चालत अडखळत चालणाऱ्या एखाद्या बालकाप्रमाणे माझी गत झाली आहे. आंध्रप्रदेश विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आणि कुलगुरू म्हणून त्यांची नेमणूक केली. विद्यापीठाचे नाव त्यांनी स्वतःच्या नावाबरोबरच जगात नावलौकिक केले. 1946 ते 1950 या काळात ते युनोस्को चे कार्यकारी सभासद आणि एक वर्ष अध्यक्ष झाले होते 1944 मध्ये चीनला व्याख्यानासाठी गेले. आणि भारतात आल्यावर “भारत आणि चीन “हा ग्रंथ त्यांनी लिहिला. राधाकृष्णन यांच्या मनावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता अहिंसा आणि सत्य यावर त्यांची श्रद्धा होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोग नेमला होता त्यांच्या शिफारशीनुसार विद्यापीठाची रचना आज तागायत वापरली जात आहे.


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय आहे तसा तर त्यांचा पिंड राजकारणाचा नव्हता पण बुद्धीच्या जोरावर आपोआपच इ.स. 1952 मध्ये त्यांची भारताचे “उपराष्ट्रपती,” या पदी निवड करण्यात आली 10 वर्षे ते या पदावर होते. इ.स 1954 साली भारत सरकारने त्यांना “भारतरत्न “ही सर्वोच्च पदवी बहाल केली एक निष्ठावंत शिक्षक राष्ट्राच्या सर्वोच्च पदी पोहोचतो हा शिक्षकी पेशाचा गौरवच म्हटला पाहिजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपला जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा करावा ही मरणोत्तर इच्छा व्यक्त केली होती .म्हणूनच आज 5 सप्टेंबर दिवस भारतभर “शिक्षकदिन” म्हणून साजरा केला जात आहे.


चांगले चाललेले देवालाही पाहत नाही अशीच घटना घडली. त्यांची पत्नी शिवकमुअम्मा अर्ध्यावरच संसाराचा डाव मोडून गेल्या .मात्र सर्वपल्ली खचून गेले नाहीत त्यावेळी इ.स.1962 ला भारतावर चीनने आक्रमण केले तसेच 1965 ला पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले या दोन मोठ्या घटना त्यांच्या विवेक बुद्धीची कसोटी ठरल्या त्यावेळी त्यांचा असामान्य धीरोदात्तपणा यावेळी जगाला दिसून आला.इ.स. 1967 मध्ये राष्ट्राला उद्देशून आपल्या राजकीय कारकिर्दीतील शेवटची त्यांचे भाषण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्रपती म्हणून पाच वर्षे काम करण्यातील समर्थता नम्रपणे व्यक्त झाली.
शेवटी 1935 साली मद्रास येथे त्यांनी बांधलेल्या “गिरिजा “या निवासस्थानी शेवटचे दिवस राहण्याची इच्छा त्यांनी पसंत केली.1967 मध्ये 79 व्या वर्षी त्यांची प्रकृती त्यांना साथ देईनाशी झाली.


धर्मशास्त्रात विशेष प्रगती करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा तेपलटैन फाउंडेशन पुरस्कार मिळाल्यावर थोड्याच दिवसात इ.स.17 एप्रिल 1975 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कोठेही पुतळे उभारले जाणार नाहीत त्याची आवश्यकताही नाही ते ग्रंथ रूपाने जगात अमर राहतील .
अज्ञान अंधार दूर करोनी
ज्ञानरूपी प्रकाशी
डॉ. राधाकृष्णन जन्मदिवशी
शिक्षकदिनसाजे भारत देशी
हीच इच्छा होती मायदेशी

 श्री संजय एलकनाथ सावंत
      (मुख्याध्यापक)
बंकटस्वामी विद्यालय खडकीघाट ता.जि.बीड.

    Views: 161
    Share

    Related Posts

    कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
    महाराष्ट्र

    कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

    September 7, 2024
    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
    महाराष्ट्र

    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

    August 24, 2024
    शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
    महाराष्ट्र

    शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

    August 23, 2024
    हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
    महाराष्ट्र

    हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

    August 18, 2024
    अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
    महाराष्ट्र

    अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

    August 18, 2024
    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
    महाराष्ट्र

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

    August 17, 2024
    Next Post
    राष्ट्रीय शिक्षक दिन विशेष…..मारुती शिरतोडे

    राष्ट्रीय शिक्षक दिन विशेष.....मारुती शिरतोडे

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    श्रेणीनुसार बातम्या

    • Uncategorized
    • आरोग्य
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • देश-विदेश
    • पुणे
    • मनोरंजन
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • संपादकीय
    • सांगली
    • सातारा जिल्हा
    • सामाजिक

    ताज्या बातम्या

    • test
    • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
    • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
    • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

    Total Visitors

    hit counter
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

    No Result
    View All Result
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)