आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
आटपाडी – प्रतिनिधी
ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी सरपंच, सदस्यांना अधिनियमानुसार जबाबदारी,कर्तव्य, कामे आणि कामकाजाची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी ओळख ग्रामपंचायत कामकाजाची होण्यासाठी दि.१० ते १२ ऑगस्ट दरम्यान आटपाडी पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे .तरी तालुक्यातील सरपंच, सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले आहे.
ग्रामपंचायतीचे कामकाज हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार चालते. अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, सभा कामकाज, रेकॉर्ड, समित्यांची रचना आणि कार्यपध्दती अंदाजपत्रक, लेखा संहिता, १ ते ३३ नमुने, ऑनलाईन ग्रामपंचायत कामकाज, योजनांची माहिती होण्यासाठी सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्ये-सातारा यांनी आटपाडी तालुक्यातील दि.१० ते १२ ऑगस्ट कालावधीत पंचायत समिती सभागृहात प्रशिक्षण आयोजित केली आहे. यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून तालुक्यातील सरपंच सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी केले आहे.






