• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, August 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!

माणगंगा by माणगंगा
August 6, 2026
in Uncategorized
0
‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!

*’राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने सायनमध्ये रंगला भव्य लाईव्ह म्युझिकल शो!*

मुंबई (विशेष प्रतिनिधी):महेश्वर भिकाजी तेटांबे

संगीताला वयाचे, धर्माचे किंवा सीमांचे बंधन नसते; ते आत्मिक समाधानाचे सर्वात मोठे माध्यम आहे, याची अनुभूती सायन येथील गोकुळ ऑडिटोरियममध्ये उपस्थितांना आली. ‘राजमुद्रा संगीत ग्रुप’ आणि ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’ (परळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य लाईव्ह म्युझिकल शो प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि टाळ्यांच्या गजरात पार पडला.

परळ येथील लक्ष्मी कराओके म्युझिकल स्टुडिओमध्ये नुकतीच एक राज्यस्तरीय हिंदी-मराठी गायन स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या उगवत्या व गुणवंत गायकांना आपले कौशल्य मोठ्या मंचावर मांडता यावे, या उद्देशाने या विशेष लाईव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवोदित गायकांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठीतील अजरामर जुन्या सुमधुर गाण्यांनी संपूर्ण गोकुळ ऑडिटोरियम संगीतमय करून टाकले.

या कार्यक्रमाला उपस्थित परीक्षक म्हणून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वेल डन आई’ या चर्चित मराठी चित्रपटाचे कार्यकारी निर्माता काफील अन्सारी उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, “संगीताची ताकद अफाट आहे. आजच्या आधुनिक काळातही जुन्या गाण्यांची जादू कायम असून, पुढील ५०० वर्षांनंतरही ही गाणी तितकीच दर्जेदार आणि अजरामर राहतील.” कार्यक्रमात नवोदित कलाकारांच्या गुणांना योग्य वाव देणाऱ्या आणि पारख करणाऱ्या परीक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

चित्रपट निर्माते व साऊंड इंजिनियर काफील अन्सारी, ‘व्हॉइस ऑफ मुकेश’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे मालक श्री. रामजी डोडीया आणि राजमुद्रा संगीत ग्रुपचे मार्गदर्शक राजगुरू सर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन नितु शेनी यांनी आपल्या रसाळ आणि ओघवत्या शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमातील रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्या आणि ‘वन्स मोअर’च्या गजरात हा लाईव्ह सुरांचा नजराणा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. नवोदित कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Views: 16
Share

Related Posts

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
Uncategorized

‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा

August 9, 2026
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 8, 2026
चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
Uncategorized

चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी

August 8, 2026
आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

August 7, 2026
आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
Uncategorized

आटपाडी येथे सरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

August 6, 2026
आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

घ्या समजून राजेहो..राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे शिवधनुष्य पेलावे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

August 6, 2026
Next Post
आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • ‘एनओसी’साठी संदीप घाडगे दाम्पत्याचा १५ ऑगस्टपासून मायणी ग्रामपंचायत कारभाराविरुद्ध आमरण उपोषणाचा इशारा
  • माझंही मत…होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करू देणे चुकीचेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था, पिंपरी तर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन; गरजू वधू-वरांना सुवर्णसंधी
  • आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; रेकॉर्डवरील तिघे गुन्हेगार ताब्यात११ देशी पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे व दोन स्पेअर मॅगझीन हस्तगत; तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)