एस.आय.आर. च्या नावाने येणा-या फसव्या लिंकपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.धुळे – एस.आय.आर. ची कामे सध्या अंतिम टप्प्यात असल्याने सगळीकडे धावपळ सुरु आहे त्याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहे.
नागरीकांना मतदार कार्ड आणि एस. आय. आर. फॉर्म मध्ये असलेल्या नावात काही तफावत अथवा विसंगती असेल तर हे सायबर गुन्हेगार मतदार कार्ड मधील तुमचे नाव करेक्ट करु यासाठी एक लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर क्लिक करताच संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करतात किंवा नागरीकांसोबत एस.आय. आर. च्या नावाने आर्थिक घोटाळा करतात.
उदा. लिंकमध्ये अथवा मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केल्यावर समोरच्या व्यक्तीने स्वतःला इलेक्शन कमिशनचा अधिकारी चंद्रशेखर असल्याचे सांगितले त्यानंतर व्हॉटस अॅपवर एक लिंक पाठवून एक बनावट एस.आय. आर. फॉर्म भरायला सांगितला. फॉर्ममध्ये नाव, मोबाईल नंबर आणि ईपीआयसी भरल्यानंतर ५ रुपये शुल्क भरण्यास सांगितले. नेट बँकींग निवडल्यावर बँक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मागण्यात आला. त्यानंतर क्रेडीट डेबीट ची माहिती मागण्यात आली. त्याने नाव, कार्डची एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही भरला शेवटी एटीएम पिन मागितल्यावर त्याला हा सायबर फ्रॉड असल्याचे लक्षात आले.
त्याने लगेच कार्ड ब्लॉक केले बँकेशी संपर्क साधला आणि १९३० वर सायबर फॉडची तक्रार केली तर मित्रांनो असा हा एस. आय. आर. फ्रॉड आहे. एस. आय. आर. मतदान कार्ड किंवा निवडणुक आयोगच्या नावाने आलेल्या कोणत्याही व्हॉटस अॅप मेसेजमधील लिंकवर लगेच क्लिक करु नका तसेच एस.आय.आर. च्या नावाने कोणी ओटीपी, एटीएम पिन, युपीआय पिन, नेट बँकींग पासवर्ड, कार्ड सीव्हीव्ही, पैसे, प्रोसेसिंग फी मागितले तर तात्काळ सावध व्हावे आणि आपल्यासोबत जर असे काही एस.आय. आर. च्या नावाने सायबर गुन्हे घडले असेल तर आपण राष्ट्रीय हेल्पलाईन १९३० या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करु शकतात.
तसेच ऑनलाईन तक्रार भारत सरकारच्या www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार दाखल करु शकतात असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी व धनंजय देशपांडे यांनी केले आहे.






