भानगडी बाज पानवन च्या एजंट ने तयार केला कराड चे प्रांतधिकारी यांचा सही शिक्का व आदेशअथवा कराडचे प्रांताधिकारी यांचे बनावट सही शिक्के व आदेश प्रकरणी एजंट संजय शिंदे सह पाच व्यक्तींना अटक
एकनाथ वाघमोडेउपविभागीय अधिकारी कराड यांच्या नावाची बनावट सही, बोगस डिजिटल स्वाक्षरी व शिक्के तयार करून त्याचा वापर केल्याचा तसेच बनावट आदेशाच्या आधारे शासकीय जमिनीची नोंदणी व फेरफार करून घेण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
यातील राज्यात गाजलेले बनावट डॉ नानाशिंदे अपहरण प्रकरण यातील मुख्य सूत्रधार संजय किसन शिंदे याने कराड या प्रांत यांचा बनावट शिक्का व डिजिटल सहीचा आदेश तयार करून फलटण येथे बोगस दस्त केला आहे असे प्रांत कराड यांच्या आदेशावरून म्हसवड मध्ये गुन्हा दाखल झाला आहेअनेक शेतकऱ्यांची फसवणूक या एजंट यांनी केली असून अशा कोट्यावधी रुपयांची फसवणूक व बोगस दस्त करून तालुक्यात मोठा धूमाकूळ घालणारी पहिली टोळी सापडली असून यातील मोठे बकासुर सापडण्याची शक्यता आहे
याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध BNS कलम 318(2), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(1), 340(2) व 351 तसेच IPC 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात संजय किसन शिंदे, रा. पानवण, ता. माण; मारुती भैरू कदम; अविनाश गोविंद कदम; द्रौपदा गोविंद कदम, प्रकाश मारुती सपकाळ, रा. जांभे, ता. जि. सातारा; आणि विनोद ज्ञानदेव आठपाडकर, रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणाची फिर्याद विश्वजीतसिंह राजारामसिंह राजपूत, वय ५० वर्षे, व्यवसाय नोकरी, उपविभागीय अधिकारी कार्यालय कराड, उपविभाग कराड, सध्या रा. सातारा, ता. जि. सातारा यांनी दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. १३ एप्रिल २०२६ ते दि. ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पानवण, ता. माण, जि. सातारा तसेच वरकुटे-मलवडी, ता. माण येथे हा प्रकार घडल्याचे नमूद आहे. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.फिर्यादीच्या आरोपानुसार, उपविभागीय अधिकारी कराड यांच्या सहीची बनावट प्रत तयार करून त्यावर बोगस डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यात आली.
तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांचे बनावट व बोगस शिक्के तयार करून ते ताब्यात ठेवण्यात आले आणि त्यांचा खऱ्यासारखा वापर करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.यासाठी उपविभागीय अधिकारी कराड यांच्या कार्यालयाने निर्गमित न केलेल्या क्र./पुनर्व/तारळी/जांभे/ए सअआर-६/२०२६, दि. २८/०२/२०२६ या आदेशाचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा आदेश खरा असल्याचे भासवून ग्राम महसूल अधिकारी, पानवण, ता. माण यांच्याकडे नोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे.यानंतर मंडल अधिकारी वरकुटे-मलवडी, ता. माण यांच्याकडून फेरफार क्रमांक ३६९९ मंजूर करून घेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर मौजे पानवण येथील गट क्रमांक ७९९ मधील २.४० हे.आर. शासकीय जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवून सातबारा सदरी नावे नोंदवून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर बनावट आदेशाच्या आधारे सह दुय्यम निबंधक, फलटण क्र. २, ता. फलटण यांच्या कार्यालयात दस्त नोंदवून शासनाच्या जमिनीची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. शासकीय कार्यालयांची फसवणूक करणे आणि संगनमताने गुन्हेगारी कृत्य करणे, असे गंभीर आरोप पाचही संशयितांविरुद्ध करण्यात आले आहेत.पोलिस नोंदीनुसार, या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. तसेच आरोपींच्या पूर्वीच्या रेकॉर्डबाबत व केलेल्या प्रतिबंधक कारवाईबाबत नोंद निरंक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा तपास सपोनि पोमण यांच्या करत असून, पोलिसांकडून बनावट आदेश, डिजिटल स्वाक्षरी, शिक्के, फेरफार नोंद आणि शासकीय जमिनीशी संबंधित दस्तऐवजांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून मुख्य आरोपी अजून मोकाट असून अजून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दलाल फरार आहेत तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून शासकीय जमिनीच्या व्यवहारात प्रत्यक्ष आर्थिक किंवा मालकीहक्काचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सध्या म्हसवड पोलिस करत आहेसध्या जलदगतीने तपास सुरू असून दोषी ना कोणत्याही प्रकारे सोडले जाणार नाही प्रत्येकावर कायदेशीर कारवाई केली जाईल उपविभागीय अधिकारी कराड अतुल म्हेत्रे






