दहिवडी पोलीसांचा कायदा सुव्यवस्थेवर कडक वाॅच! नव्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त व कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी, आप्पा नाना फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार
गोंदवले प्रतिनिधी प्रतिनिधी:
दहिवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने पोलीसप्रशासनाकडून कडक पावले उचलली जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोसावी यांनी दि.२९जुन२०२६ रोजी दहिवडी पोलीस स्टेशनचा कारभार स्वीकारल्यानंतर कायदा- सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज डोईफोडे यांनी ही नुकताच कार्यभार स्वीकारला असून, त्यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त ठेवणे तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे, या बाबींवर पोलीस प्रशासनाकडून विशेष दिली जात आहे.
नवीन अधिकारी रुजु झाल्यानंतर पोलीस यंत्रणेच्या कामकाजात अधिक शिस्त,तत्परता आणि कायदेशीर अंमलबजावणीला प्राधान्य दिले जात असल्याची चित्र दिसून येत आहे. विविध कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय योजनांवर भर दिला जात आहे.
दरम्यान, आप्पा नाना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुगंध राव यादव यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला भेट देऊन नवनियुक्त अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. सुगंध राव यादव यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य श्री. मनोज मोरे, श्री. अतुल जाधव आणि श्री. महेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब गोसावी तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज डोईफोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दहिवडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सुरू असलेल्या कामकाजाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था ही अत्यंत महत्वाची बाब असून, पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कायदा सर्वांसाठी समान असून, कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कायद्याची अंमलबजावणी करताना नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची भूमिका आहे. दहिवडी पोलिसांकडून भूमिकेतून कामकाज अधिक प्रभावी करणाऱ्यांवर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. दहिवडी तालुक्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक, धार्मिक तसेच सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असताना. अशा वेळी कायदा-सुव्यवस्था अबाधितठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत महत्त्वाचा ठरतो. संभाव्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहणे आणि नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. नवीन अधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, बंदोबस्त आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्राधान्य देण्यात येत आहे.
भविष्यातही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दहिवडी परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत सामाजिक संस्था, नागरिक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनीही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले, तर गुन्हेगारीला आळा घालण्या बरोबर च कायदा- सुव्यवस्था अधिक सक्षम पणे राखता येईल.आप्पा नाना फाउंडेशनचे केलेल्या या सत्कारामुळे पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था मधील समन्वयाची सकारात्मक दिशा अधोरेखित झाली आहे. दहिवडी पोलीस स्टेशनच्या नव्या नेतृत्वाकडून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या असून, कायदा सुव्यवस्था राखताना कठोरता आणि नागरिकांशी संवाद ठेवताना संवेदनशीलता, या दोन्ही बाबींचा समतोल राखत पोलिसांचे कामकाजापुढे जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






