आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती
सनातन धर्माच्या रक्षा आणि ऋषी परंपरेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाडा परिषदेच्या वतीने महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.
नारायणगाव, पुणे येथील महामंडलेश्वर श्री योगी राजुनाथ जी महाराज यांची आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या राष्ट्रीय संयोजक – महाराष्ट्र प्रभारी पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतगुरु श्री सच्चिदानंद बालप्रभू जी महाराज यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले आहे. या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, योगी राजुनाथ जी महाराज आखाड्याच्या उद्देश, सिद्धांत आणि मर्यादांचे पालन करत संघटन विस्तार, सनातन धर्म रक्षण, समाजात सद्भाव, सेवा आणि संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी पूर्ण निष्ठेने कार्य करतील
.त्यांच्या अनुभव, नेतृत्व क्षमता आणि संघटनेप्रती असलेल्या समर्पण भावनेतून आखाड्याला नवी उंची मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याचे मुख्य कार्यालय सुदर्शन एन्क्लेव, शिवशंकर नगर, प्रताप नगर, सांगानेर, जयपूर (राजस्थान) येथे आहे.


