राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर कोकण आणि मुंबई विभागीय दौ-याचे आयोजन.. अजित पाटील राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियान
मुंबई (प्रतिनिधी)
राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांचा पहिला टप्प्यात महाराष्ट्राच्या खालील जिल्हा दौरा यशस्वी झाला. त्यामध्ये पुणे,नांदेड,सातारा,हिंगोली,कोल्हपूर, परभणी, सांगली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड,लातूर,अहिल्यानगर,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,बुलढाणा,वाशिम, अकोला, अमरावती,यवतमाळ,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होता.
त्यानंतर १ सप्टेंबर-सिंधुदुर्ग,२ सप्टेंबर रत्नागिरी,३ सप्टेंबर रायगड,४ सप्टेंबर-पालघर,५ सप्टेंबर ठाणे,६-सप्टेबर मुंबई शहर व मुंबई उपनगर अशा दौ-याचे आयोजन केले आहे.या दौऱ्या दरम्यान रासप युवक आघाडीच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा अधिकृत नियुक्त्या दररोज सकाळी ठीक ११:०० वाजता करण्यात येणार आहे. तरुणाईची ताकद, रासपची ओळख ! चला एकत्र येऊया, पक्षाची नवी फळी उभारूया. असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांनी सांगितले.






