• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
September 2, 2026
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी

*घ्या समजून राजेहो….**डॉ. मोहन भागवतांच्या विधानाचा अन्वयार्थ*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी शनिवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे मेडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये आयोजित “अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग” द्वारे आयोजित “युनिव्हर्सल सेलिब्रेशन” या कार्यक्रमात उद्बोधन केले. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या ३९ राज्ये ८५० शहरे यातून सहा हजारावर प्रतिनिधी तर सहभागी झाले होतेच, पण जगभरातून २९ देशातूनही प्रतिनिधी सहभागी झाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. भागवत सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तिथल्या हिंदू बांधवांशी आणि अन्य धर्मीयांशी संवाद साधत आहेत.यावेळी बोलताना डॉ. भागवत यांनी जो हिंदू भारतात मुसलमान नकोत असे म्हणतो, तो हिंदुच नव्हे, अशा आशयाचे विधान केल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर विविधता आणि एकता ही हिंदूंच्या तसेच भारतीय यांच्या डीएनएतच आहे असेही ते बोलले आहेत.डॉ. मोहन भागवतांच्या या विधानांवरून भारतात संघ विरोधकांचे राजकारण सुरू झालेले दिसून येते आहे. काँग्रेसचे कपिल सिबल, शिवसेनेचे संजय राऊत, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, एम आय एम सी अससुद्दीनओवेसी यांच्यासह अनेकांनी मोहन भागवतांवर टीका केली असून भागवत अमेरिकेत जे बोलले ते भारतात येऊन बोलावे आणि त्यांच्या स्वयंसेवकांना हे समजावून सांगावे असे आवाहन या मान्यवरांनी केले आहे.

नेहमीप्रमाणेच संघ दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील केला जातो आहे. वस्तुतः मोहन भागवत अमेरिकेत जाऊन जे काही बोलले ते भारतात देखील अनेकदा बोललेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ मध्ये स्थापना झाली, ती या देशातील हिंदूंना संघटित करण्यासाठी. कारण त्यापूर्वी हिंदू विभिन्न जातींमध्ये आणि पंथांमध्ये विभागलेले होते. त्याचाच फायदा आधीच्या हजार वर्षात परकीय आक्रमकांनी घेतला होता आणि भारतावर आपले साम्राज्य जमवले होते. आजच्या भारतात हिंदूंसह मुसलमान, ख्रिस्ती, शीख, पारशी, बौद्ध, जैन हे समाज गुण्यागोविंदाने नांदत आहेत. जर इतिहास तपासला तर यातील पारशी वगळता बहुसंख्य नागरिक हे मूळचे हिंदूच होते असे आढळून येते. त्यामुळेच भारतीय मातीशी इमान राखतो आणि इथल्या संस्कृतीनुसार जो जीवन जगतो, मग भलेही तो कोणतीही पूजा पद्धती अवलंबत असो आणि कोणत्याही धर्माची उपासना करत असो, तो हिंदूच आहे अशी संघाची धारणा राहिलेली आहे,

हे संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी स्पष्ट देखील केले आहे. इथे मला एक बाब स्पष्ट करायची आहे. वरील विधान करताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही पदाधिकारी किंवा प्रवक्ता नाही. मात्र संघ अभ्यासक पत्रकार या नात्याने जे काही माझे आकलन असते तेच मी वाचकांसमोर मांडत असतो.वरील मुद्द्यांवर अधिक स्पष्टता मांडण्यासाठी आणण्यासाठी आपल्याला थोडा इतिहास तपासणे आवश्यक आहे. प्राचीन काळातील भारत भूमी म्हणजेच आजचा भारत, त्याचसोबत शेजारी असलेले श्रीलंका, ब्रह्मदेश, म्हणजेच आजचे म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे सर्व भारत देश किंवा हिंदुस्थान म्हणून ओळखले जात होते. नंतर इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार त्याचे तुकडे केले आणि वेगवेगळे देश केले याच्या नोंदी इतिहासात सापडतात.

प्राचीन काळापासून हिंदू संस्कृती अस्तित्वात आहे, असा दावा अनेक अभ्यासक करतात. अर्थात काही पुरोगामी अभ्यासक त्याला विरोधही करतात. मात्र वैदिक काळापासून ही संस्कृती आहे असे जाणकार सांगतात. इसवी सनानंतरच्या सुरुवातीच्या काळात या देशात बौद्ध धर्माची निर्मिती झाली. नंतरच्याच काळात जैन धर्माची देखील निर्मिती झाली. त्यामुळे इथले बहुतेक सर्व बौद्ध आणि जैन हे हिंदूच आहेत. त्यानंतर शीख पंथ हा देखील मुळचे हिंदू असलेल्या गुरुनानक यांनीच स्थापन केलेला आहे. त्यामुळेच हिंदू जे की त्या काळात सनातन म्हणून ओळखले जात होते, बौद्ध जैन आणि शिख हे सर्वच साधारणतः आठव्या शतकापर्यंत गुण्यागोविंदाने इथे नांदत होते, अशा नोंदी इतिहासात सापडतात. साधारणपणे आठव्या शतकाच्या दरम्यान मुस्लिम आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण करणे सुरू केले. त्यावेळी हा हिंदुस्थान छोट्या छोट्या राज्यांमध्ये वाटलेला होता. मुस्लिम आक्रमकानी एक एक राज्य ताब्यात घेणे सुरू केले आणि तलवारीच्या जोरावर इथल्या हिंदू बौद्ध जैन आणि शिखांना पाठवून मुस्लिम बनवणे सुरू केले. त्यामुळेच भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढली. जर इतिहास तपासला तर इथले ९५ टक्के मुसलमान हे हिंदूच होते असे आढळून येते.

त्या काळात मुस्लिम राजांनी अनेक हिंदू मुलींना बाटवले. अनेकांना आपल्या जनानखान्यात ठेवून घेतले आणि त्यांना बळजबरीने मुसलमान बनवले. फक्त माणसांनाच मुसलमान बनवले असे नाही, तर हिंदूंची अनेक मंदिरे ताब्यात घेऊन तिथल्या हिंदू देवतांच्या मूर्ती फोडून त्या मंदिरांच्या मशिदी केल्या. अयोध्येतील बाबरी मशीद हा इतिहास सर्वांसमोर आहेच. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक भैरप्पा यांच्या आवरण या कादंबरीत अशा अशा बळजबरीने पाठवण्याचे सविस्तर उल्लेख आहे. इतरत्रही हे उल्लेख सापडतात. साधारणतः १४ व्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने ख्रिस्ती लोक भारतात आले. त्यांनी जरी तलवारीच्या जोरावर नाही तरी इथल्या गोरगरिबांचा भोळेपणाचा फायदा घेत त्यांना बळजबरीने ख्रिस्ती बनवले. याचेही अनेक दाखले इतिहासात सापडतात. त्यामुळे इथले बहुसंख्य ख्रिस्ती हे देखील मुळचे हिंदूच आहेत. हिंदू समाज हा सुरुवातीपासूनच सहिष्णू समाज म्हणून ओळखला जातो. धर्मप्रसारासाठी अन्य धर्मीयांवर बळजबरी करणे, त्यासाठी अन्य धर्मीयांवर अत्याचार करणे, किंवा त्यांना फसवून आपल्या धर्मात आणणे हे हिंदू धर्माला मान्य नाही.

तसेच इतर धर्माचा किंवा इतर धर्मीयांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणे हे देखील हिंदू धर्मियांना मान्य नाही. त्यामुळे भारतातील हिंदू समाज हा कायम अन्यधर्मियांशी सहष्णुतेचेच धोरण ठेवत आलेला आहे. त्याने अन्य धर्मीयांना बळजबरीने आपल्या धर्मात आणण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि अन्य धर्मीयांची श्रद्धास्थाने कधीही अपवित्र करण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी आजचा हिंदू समाज मुस्लिमांच्या ईदच्या दिवशी खीरखुर्मा देखील खातो, इफ्तार मध्ये देखील सहभागी होतो, तसाच ख्रिश्चनांचा क्रिसमस देखील उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे भारतातील हिंदू समाज अन्य धर्मीय आपल्या देशात नकोतच अशी भूमिका कधीच घेत नाही, उलटपक्षी अन्य धर्मीयांचे तो तितकेच स्वागत करतो. मात्र अन्य धर्मीयांचे अनावश्यक लांगुलचालन हे देखील त्याला मान्य नाही.

जे संविधानाने घालून दिलेले नियम कायदे आहेत ते सर्व धर्मीयांसाठी समान असावेत हीच इच्छा हिंदूंची अपेक्षा असते. मात्र अन्य धर्मीयांनी एक गठ्ठा मतांचे राजकारण करत सुरुवातीच्या काळात तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर दबाव आणत आपल्या धर्मासाठी वेगळे कायदे आणि हिंदूंसाठी वेगळे कायदे करून घेतले आणि परिणामी अल्पसंख्यांकांचे आकारण लाड केले जाऊ लागले. त्यामुळेच संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. आज ध्वनी प्रदूषण टाळायचे म्हणून लाऊड स्पीकरचा आवाज किती असावा याचे नियम मोडून जेव्हा मशिदीवर भोंगे वाजवले जातात आणि सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा इथला हिंदू संतप्त होतो. माझ्या मते त्यात चुकीचे काहीही नाही. सर्व धर्मीयांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू असताना फक्त मुस्लिमांनाच त्यात सूट दिली जाते, आणि समान नागरी कायदा देशात लागू केला जात नाही, सर्व धर्मियांना कुटुंब नियोजनाचा नियम लागू असताना मुस्लिमांना त्यातून सूट दिली जाते तिहेरी तलाकचे फायदे दिले जातात, तेव्हाच इथला हिंदू दुखावला जातो. जेव्हा मंदिरासमोरून मोहरमचा जुलूस गेलेला चालतो, मात्र मशिदीसमोरून गणपतीची मिरवणूक गेलेली चालत नाही, आणि त्या मिरवणुकीवर दगडफेक केली जाते तेव्हाच हिंदू दुखावतो. आजही आपल्या देशात गोरगरीब आदिवासी दलित यांच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेत त्यांना बळजबरीने हिंदू धर्म त्यागून मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला जातो, तेव्हा हिंदू समाज संतप्त होतोच. हिंदू समाज अन्य धर्मीयांना बळजबरीने आपल्या समाजात या असे कधीच सांगत नाही.

मात्र गेल्या हजार पंधराशे वर्षात इथले जे हिंदू बळजबरीने अन्य धर्मात गेलेले आहेत त्यांना स्वधर्मात आणण्यासाठी इथल्या हिंदू संघटना आजही सक्रिय आहेत. अर्थात हे सर्व कोणाचाही दबाव न आणता आणि सामोपचरानेच केले जात असते. विश्व हिंदू परिषदेतर्फे अशाप्रकारे बरेच कार्यक्रम घेतले जात असतात. अर्थात मूळचे हिंदू असले तरी जे अन्य धर्मीय सध्याच्या धर्मात खुश आहेत, त्यांना भारतातला हिंदू समाज कधीही त्रास देत नाही, उलट पक्षी अन्याधर्मीय हिंदूंना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी कानावर येत असतात. अर्थात त्यातली वास्तविकता जाणून घेणेही गरजेचे असते. डॉ. मोहन भागवत यांनी जे विधान केले त्याकडे वरील मुद्द्यांच्या परिप्रेक्ष्यात बघायला हवे असे माझे मत आहे. इथला हिंदू हजारो वर्षांपूर्वी जसा सहिष्णू होता, तसाच आज २१व्या शतकात देखील सहिष्णूच आहे. इथला हिंदू कधीही अन्य धर्मीयांचा विश्वास करणारा ना,ही अन्य धर्मीयांना बळजबरीने आपल्या धर्मात आणण्यासाठी दबाव आणणारा इथला हिंदू नाही, तसेच इथला हिंदू आजही अन्य धर्मीयांनी नियमांच्या चौकटीत राहून निर्माण केलेल्या त्यांच्या श्रद्धा स्थळांना कधीही धक्का देणारा नाही, मात्र त्यांच्या श्रद्धा स्थळांना जर अन्य धर्मीयांनी धक्का दिला त्यांच्या निरपराध नागरिकांवर धर्माच्या नावाने अन्य धर्मीयांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इथला हिंदू शांत राहत नाही.

डॉ. मोहन भागवतांच्या अमेरिकेतील विधानाचा हाच अन्वयार्थ घेता येईल. मात्र देशातील काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी आणि विचारवंतांनी कायम हिंदुत्वाला आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी खोटा इतिहास देखील समोर आणला आहे. त्यातूनच मोहन भागवतांच्या विधानावर कपिल सिब्बल, अखिलेश यादव, संजय राऊत, ओवेसी वडेट्टीवार मंडळींची टीका चालू आहे. मात्र जनसामान्यांनी नेमके वास्तव काय ते समजून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.या संदर्भात आपल्या स्पष्ट आणि परखड मतांचे स्वागतच आहे…वाचकहो पटतय का तुम्हाला हे…..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…..

Views: 66
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही… 

चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत  शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही… 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)