मिशन बिगिन अगेन’अंतर्गत आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी.
आठवडी बाजार बंद होवून ९ महिने झालेले आहेत त्यामुळे ग्रामीण अर्थचक्र मांदावले आहे. गावा गावातील छोटा व्यावसायिक, व्यापारी, कारागीर, मूर्तिकार, मजूर, दलाल, हमाल असे पूर्णपणे बाजारावर अवलंबून असणारे हालाखीची जीवन जगत आहेत. शेतकरी यांना जनावरे, धान्य, भाजीपाला, फळे विक्री करता येत नसल्याने मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
पण याकडे शासन डोळाझाक करत आहे. शहरातील मार्केट, मॉल सुरू होवून दोन महिने झालेले आहेत. त्याचवेळी ग्रामीण आठवडी बाजारास मिशन बिगेन अगेन अंतर्गत परवानगी द्यायला पाहिजे होती पण तसे न करता ग्रामीण भागातील जनतेस त्रास दिलेला आहे. अगोदरच ग्रामीण भागातील जनता कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी यामुळे आर्थिक अडचणीत आहे. ग्रामीण भागात व्यवहार मंदावलेले असल्याने छोटे व्यावसायिक, व्यापरी यांचे व्यवसाय मोडीत निघाले आहेत.
त्यात शासनाचे सहकार्य तर नाही उलट अन्याय करत आहे. मागील दोन महिन्यापासून मिशन बिगेन अगेन अंतर्गत जिल्हास्तरावर आणि ग्रामस्तरावर परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय घेता येतील असे राज्यशासनाने सूचित केले असताना आजपर्यंत आठवडी बाजार सुरू करण्याचे निर्णय घेतलेला नाही. आतातरी औरंगाबाद जिल्ह्यात ज्याप्रमाणे आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे त्याप्रमाणे इतर जिल्ह्यास परवानगी द्यावी अशी मागणी हिंद संस्थेचे सचिव संजय शिंदे यांनी केली आहे.







