‘घरोघरी शाळा’ उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल : शिक्षणाधिकारी मा. भास्करराव पाटील
नगर जिल्ह्यातील शिस्तबाग येथे ‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे उदघाटन.
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम नगर जिल्ह्यतील जि. प. प्राथ. शाळा शिस्तबाग येथील मुख्याध्यापिका श्रीम.अनिता काळे मॅडम यांनी शिस्तबाग ता. नगर येथे राबवण्यास सुरुवात केली आहे.
सदर उपक्रमाचे उदघाटन
अहमदनगर शहराच्या महापौर मा.सौ.रोहिणीताई शेंडगे व नगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा.श्री. भास्करराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आनंदमय वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी मा.श्री.रवींद्र कापरे साहेब, प्रशासन अधिकारी म. न. पा. शिक्षण अधिकारी मा. श्री सुभाष पवार साहेब, मा.नगरसेविका मा. शारदा ताई ढवण, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मा. सुरेशजी इथापे साहेब, मा. केंद्र प्रमुख वडगांव गुप्ता मा. दिलीपजी दहिफळे साहेब, म. न. पा. शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मा. जुबेर पठाण सर, केंद्र समन्वय नागपूर मा.श्री नरवडे सर
यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रसंगी मा. शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील म्हणाले की, 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम नगर जिल्ह्यातील अनेक शाळा श्री. संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहेत. कोरोनासारख्या भयंकर संकट काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरु ठेवणारा सदरचा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल.
महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की,कोरोनाच्या संकटामुळे मागील दीड वर्षापासुन शाळा बंद आहेत. असल्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. पंरतु जि. प.प्राथ. शाळा भिस्तबागच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनिता लक्ष्मण काळे व सहकारी शिक्षिका श्रीम् सुरेखा वाघ, सौ शितल आवारे यांच्या सहकार्याने विदयार्थ्यांच्या घरी जाऊन तक्ते बनवून स्वतंत्र शाळा तयार करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवले आहे.
‘घरोघरी शाळा’ उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांनी सदर उद्घाघाटन सोहळयास ऑनलाईन उपस्थित राहून उपक्रमा विषयी माहिती सांगितली.
उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी 'घरोघरी शाळा' या उपक्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रम राबविल्याबद्दल काळे मॅडम यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर उपक्रम राबवताना सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका श्रीम.मनिषा कदम,संगिता बनकर मॅडम, गर्जे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.







