डोंगरगाव येथे गुरांवर लंपी आजार प्रतिबंध लसीकरण करा असंख्य शेतकऱ्यांची मागणी =
===============================
डोंगरगाव (आर आर पाटील) डोंगरगाव आणि परिसरात सध्या गुराढोरांना सह शेळ्या-मेंढ्या वर लंपी आजाराची लक्षणे दिसून येत आहेत त्यामुळे शेतकरी व मेंढपाळ वर्ग यांच्यात एकूणच घबराटीचे वातावरण दिसून येत आहे गुरे शेळ्या मेंढ्या पायाने अधू होणे चारा न खाणे ताप येणे आदी भरपूर विविध लक्षणे दिसून येत आहेत काही शेतकरी खाजगी गुरांचे डॉक्टरांकडून उपचार घेतांना गावातून दिसून येत आहे परंतु हे खूप खर्चिक असून गरीब शेतकरी व मेंढपाळ लोकांना ते परवडणारे नाही म्हणून पशु वैद्यकीय विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन गावातच लंपीआजार प्रतिबंधक लसी गुराढोरांना शेळ्या मेंड़या ना द्याव्यात असे डोंगरगाव परिसरातून असंख्य शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे







