केंद्र सरकारने कापसा संदर्भात चुकीचा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनास तयार राहा ==प्रकाश पाटील डोंगरगाव
( प्रतिनिधी )आर आर पाटील
यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पन्नात विक्रमी घट आलेली आहे प्रति एकरी चार ते पाच क्विंटल एवढ्या कमी प्रमाणात कापूस निघाला आहे आणि जागतिक बाजारपेठेत तेजी असल्याने कापसास मोठ्या प्रमाणावर मागणी आहे म्हणून कापूस पिकास नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे परंतु दक्षिण व्यापारी संघटना आणि मोठे वस्त्र उद्योग व्यापारी वर्ग कापसाचे दर वाढल्याने केंद्र सरकारवर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत
कापसावर निर्यातबंदी लागू करा कापसावरील आयात शुल्क माफ करा या गोष्टींचा आग्रह केंद्र सरकारवर करीत आहेत आणि जर का केंद्र सरकारने वरील व्यापाऱ्यांनी आणि उद्योग व्यवसायिकांनी सांगितल्याप्रमाणे वरील दोन्ही गोष्टी जर का केल्यात तर मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव कमी होतील
सध्या मोठे व्यापारी मुद्दाम हून कापसाचे दर कमी करत असून मोठे कापड निर्यातदार पंतप्रधानांवर दबाव टाकत आहेत म्हणून शेतकरीवर्गाने सतर्क राहणे गरजेचे असून जर का केंद्र सरकारने वरील लोकांचे ऐकून दबावाला बळी पडून कापसावरील निर्यातबंदी लागू केली
कापसावरील निर्यात शुल्क माफ केले तर शेतकऱ्यास मोठा फटका बसणार आहे असे झाल्यास शिंदखेडा तालुक्यातील सर्व जनसामान्य शेतकऱ्यांसह केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी दिलेला आहे व या गोष्टीसाठी शेतकरी बंधूंनी सज्ज राहावे अशी ही विनंती केलेली आहे







