जळगाव येथील नाभिक समाजच्या तरुण दुकानदराच्या हत्या प्रकरणी दोंडाईचातील नाभिक समाजाकडून निषेध व्यक्त करत अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..
दोंडाईचा- श. प्र. जळगाव शहरात दिनांक 21 रोजी रात्री दहा वाजता चौगुले प्लॉट भागातील नाभिक समाज बांधव श्री सुनील सुरेश टेमकर वय 36 रा. प्रजापत नगर, ममुराबाद रोड जळगाव यांचे सलुन दुकान आहे. दि. 21 रोजी रात्री दहा वाजता गुन्हेगार प्रवृत्तीचे संशयित चार जण दारु पिण्यासाठी पैसे व ब्लेड न दिल्यामुळे त्यांना राग आला व त्यांनी या नाभिक समाज बांधवाची चॉपर सारख्या शस्त्राने निर्घुण हत्या करत खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याच्या निषेधार्थ आज दोंडाईचा शहरातील युवक मंडळ व नाभिक समाज बांधव यांच्या वतीने सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले होते की, अशा या सराईत गुन्हेगारांना शोधून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व या परिवाराला न्याय मिळावा अन्यथा नाभिक समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा ईशारा युवक मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
याप्रसंगी युवक मंडळाचे शहर अध्यक्ष समाधान ठाकरे, उपाध्यक्ष दिनेश बोरेसे, दुकानदार संघाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते, शहर अध्यक्ष छोटू महाले, उपाध्यक्ष राजेंद्र सोलंकी सचिव कैलास चित्ते दुकानदार संघाचे शहराध्यक्ष उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, जेष्ठ सल्लागार भावराव सैंदाणे, गोपाल बोरसे, लोटन पवार, हिम्मत पवार, रोहित सैंदाणे, अनिल चित्ते, आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या.