…
अटीतटीच्या झालेल्या लढतीत सातारा जिल्हा बँकेत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे विरुद्ध मनोज पोळ यांच्यात जोरदार सामना रंगला.यात शिवसेनेच्या शेखर गोरे यांना ३६ तर राष्ट्रवादीच्या मनोज पोळ यांना ३६ अशी समसमान मते मिळाली.तर ऐनवेळी माजी संचालक व आमदार जयकुमार गोरे यांनी चक्क पॅनलसह माघार घेतल्याने या सोसायटी मतदारसंघावर जिल्हयासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
यात अखेर चिठ्ठीद्वारे शेखर गोरेंनी नशिब आजमावले.तर जावळी सोसायटी गटात ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवत आमदार शशिकांत शिंदेंचा १ मताने पराभव केला.दुसर्या प्रतिष्ठेच्या सोसायटी गटात गृहराज्यमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांचा पराभव करत सत्यजीत पाटणकरांनी १४ मतांनी विजय मिळवला.खटाव सोसायटी गटात नंदकुमार मोरेंना पराभूत करत १० मतांनी प्रभाकर घार्गे विजयी झाले.
कराड सोसायटी गटात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील यांचा ८ मते मिळवत विजय मिळवला.बॅंक व पतसंस्था गटात सुनिल जाधवांचा पराभव करत रामराव लेंभे २६० मतांनी विजयी झाले.तर ओबीसी प्रवर्ग गटात शेखर गोरेंचा पराभव करत विद्यमान जि.प उपाध्यक्ष प्रदीप विधाते १०८० मतांनी विजयी झाले
तर महिला प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखेंनी विजय मिळवला.माण व कोरेगाव सोसायटी गटात उमेदवारांनी समान मते मिळवली तर दोघांनीही टाय करत कोरेगावात शिवसेनेचे सुनिल खत्री व माणमध्ये शेखर गोरे ठरले लकी मॅन!