महात्मा फुले यांच्या विचारांचा
जागर होण्याची गरज
डॉ श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
सासवड, दि. 30 महात्मा फुले यांचा समतेचा विचार सुधारणावादी आहे. मानवतेची बीजे खोल रुजविण्यासाठी त्यांनी केलेले काम समाज विसरू शकत नाही. परंपरा,रुढी, अंध श्रद्धा मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी केले.
खानवडी (ता.पुरंदर) येथे चौदाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ सबनीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके होते. प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे , निमंत्रक सुनीलतात्या धिवार, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विजय कोलते, सुदाम अप्पा इंगळे, नलिनी लोळे, गणेश मुळीक, डॉ जयप्रकाश घुमट कर, प्रकाश दिंडले,उमेश गवळी,रमेश आबा इंगळे उत्तम कामठे, श्रीकांत होवळ आदी उपस्थित होते.
डॉ सबनीस म्हणाले, महात्मा फुले यांच्या मूळ गावी विचारांचा जागर होत आहे, याचे समाधान आहे, महात्मा फुले यांनी सुधारणावादी विचार नुसता मांडला नाही, तर कृती मध्ये उतरविला. म्हणून त्यांच्या समकालीन सुधरकांपेक्षा त्यांचे काम मोठे आहे.
श्री नरके म्हणाले, महात्मा फुले यांच्या विचारानेच समाज जागृत झाला आहे. मानव कल्याणचा विचार सगळ्यांनी आत्मसात करावा.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली.
, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक गुलाबराव वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. प्रा योगेश्री कोकरे, डाँ जगदीश शेवते, डाँ बळवंत भोयर यांनी सहभाग घेतला. संमेलनाचा समारोप कवी संमेलनाने झाला. होणार आहेत. कवी बाळासाहेब गिरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. कवी जगदीप वनशीव व सुनीता निकम यांनी सूत्रसंचालन केले., संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले यांनी केले.







