आर सी पटेल संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी
शिरपूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. मात्र आता शासनाने एक डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. एक डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते चौथी चे वर्ग आता प्रत्यक्षरीत्या सुरू झालेले आहेत.या पार्श्वभूमीवर आर सी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या प्रयत्नाने संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करण्यात येत आहे.
आर सी पटेल संस्थेत या अगोदर आठवी ते बारावी चे वर्ग सुरू होते. मात्र आता एक डिसेंबर पासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग ही प्रत्यक्षरित्या सुरू झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर या अगोदरच संस्थेचे उपाध्यक्ष भंडारी यांच्या सूचनेनुसार सर्व शिक्षकांनी कोरोनाचे प्रतिबंधक दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.
आता इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.त्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली आहे. दिनांक १ डिसेंबर रोजी १४३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली.
यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश बागुल यांनी सहकार्य केले. तर शिक्षकांच्या RTPCR चाचणीसाठी मुख्याध्यापक सी.डी.पाटील,स्मिता जोशी,विजेंद्र बोरसे,अभिलाष महाजन यांनी मेहनत घेतली.







