तऱ्हाडी ग्रामपंचायत तर्फे अपंग व्यक्तींना साहित्य वाटप
तऱ्हाडी:-जागतिक अपंग दिनानिमित्त दरवर्षी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील निधीतून पाच टक्के निधी हा गावातील अपंग व्यक्तींच्या सहानुभूतीसाठी राखीव असतो त्यातून तऱ्हाडी ग्रामपंचायतीतर्फे आज जागतिक अपंग दिनानिमित्त गावातील विकलांग व्यक्तींना पुंडलिक भामरे . रमेश बोरसे नंदलाल सोनवणे रविंद्र सोनवणे यांना सायकल. कानाचे मशीन व स्टिक इ.साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी सरपंच जयश्री धनगर उपसरपंच उजनबाई अहिरे मल्हार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाने तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम भामरे उपाध्यक्ष युवराज भलकार नरेंद्र सोनवणे भावनेश पाटील गुलाब पाटील सिताराम अहिरे व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते
फोटो:- तऱ्हाडी ग्रामपंचायत तर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग व्यक्तींना साहित्य वाटप करताना सुनील पाकळे ग्राम विकास अधिकारी अविनाश बैसाने व इतर