स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी असा असावा भारत
चिमुकल्यांनी व्यक्त केल्या अपेक्षा
पोस्टकार्ड लेखन मोहिमेत पटेल विद्यालयातील चिमुकल्यांनी मांडले विचार
त-हाडी
शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली.सदर मोहीम ही “भारतीय टपाल विभाग व शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या” वतीने राबविण्यात येत आहे.यात पोस्टकार्ड लिहून विद्यार्थ्यांनी २०४७ वर्षात भारत देश कसा असावा ? याविषयी आपले विचार मांडले.तसेच लिहिलेले पोस्टकार्ड पंतप्रधान यांना पाठविण्यात आले आहेत.या मोहिमेत देशातून ७५ लाख पोस्टकार्डवर लिहून विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
इयत्ता चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक १ ते २० या कालावधीत संपूर्ण देशात ही मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्यातील न ऐकलेले नायक आणि वर्ष २०४७ मध्ये भारतासाठी माझे विजन (दृष्टी)* या विषयावर पोस्ट कार्डवर लिखाण करून सदर पोस्ट कार्ड भारताचे पंतप्रधान यांना पाठविले जाणार आहे.या अंतर्गत दिनांक ११ डिसेंबर रोजी शहरातील आर.सी .पटेल मराठी प्राथमिक शाळा शाळेत पोस्टकार्ड मोहीम राबविण्यात आली.यात विद्यालयातील इयत्ता चौथीतील २२० विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर पोस्टकार्ड लेखन केले.ते पंतप्रधान यांना पाठविण्यात आले.
यावेळी शिरपूर पोस्ट ऑफिसचे मुख्य पोस्ट मास्तर आबा साळुंखे, शाळेचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील ,पोस्ट कार्यालयातील कल्याण बावा,धनराज मराठे हे उपस्थितीत होते.या संदर्भात शिक्षक गजेंद्र जाधव,विवेकानंद ठाकरे,ए.बी.पाटील,अरुण हातेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून पोस्टकार्ड लेखन केले. देशाच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यावेळी आता शालेय अवस्थेत असणारी पिढी ही देशाची जबाबदार नागरिक होणार आहे. त्या अनुषंगाने २०४७ वर्षात आपला भारत कसा असावा ? या संदर्भात विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याचा यानिमित्ताने एक संधी मिळाली आहे. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी अतिशय वेगवेगळ्या कल्पक विचारांनी २०४७ ला भारत कसा असावा ? हे पोस्ट कार्ड वर मांडले आहे. सदर पोस्टकार्ड हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेले आहेत.
### भारत इतर सर्व देशांसाठी एक आदर्श राष्ट्र व्हावे. तसेच २०४७ मध्ये भारतातील मनुष्य संगणका प्रमाणे मायक्रोचीप आपल्या शरीरात बसवून संगणका प्रमाणे काम करत दिसावा.व माझा देश हा सर्वच पातळीवर गतिमान विकास असलेला देश व्हावा.तसेच येथील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी न जाता देशात राहून भारताच्या प्रगतीत हातभार लावेल असा माझा भारत घडावा.
कुशल माळी व लक्षदीप पाटील,विद्यार्थी इयत्ता चौथी
##तांत्रिक,आर्थिक बाबतीत माझा भारत देश प्रथम क्रमांकावर असेल. शेती, वन या बाबतीत भारत संपन्न देश व्हावा.प्लास्टिक मुक्त भारत ! सुरक्षित भारत!विकसित भारत यासाठी माझा देशाची ओळख निर्माण व्हावी.
रश्मिता जाधव,विद्यार्थी इयत्ता चौथी
आज विद्यार्थी असलेलेच भारताच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी जबाबदार नागरिक असतील.प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना आपला देश कसा असावा ? हे जेव्हा विद्यार्थ्यांनी मांडलेले बघितले तेव्हा नवीन पिढीला आत्मनिर्भर भारतच हवा हेच जाणवले.
सी.डी.पाटील,मुख्याध्यापक







