तऱ्हाड कसबे येथे महाजन बाबा यांचा यात्रोत्सव निमित्ताने आज बारा गाड्या बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम
त-हाडी (प्रतिनिधी) तालुक्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील सर्वात मोठी असलेली तऱ्हाड कसबे येथील महाजन बाबा यात्रोत्सव मार्गशीर्ष शु।द्वादशी व त्रयोदशीला 15 डिसेंबर पासून दोन दिवसीय यात्रोत्सव सुरु होत आहे.या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम असून हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात.
या निमित्ताने महाजन बाबा यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या यात्रोत्ससाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीकडून देण्यात आली.शिरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा भरते.तऱ्हाड कसबे येथील महाजन बाबा देवस्थान हे पंचक्रोशीतील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्यातील द्वादशी व त्रयोदशीला ही यात्रा म्हणजे गावातील व परिसरातील भाविकांना एक पर्वणीच असते.नवसाला पावणारे देवस्थान असल्याने परिसरातील अबालवृद्ध येथे मनोभावे नतमस्तक होतात . यात्रोत्सवादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.







