किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट
तर्फे पालघर मध्ये भारतीय संविधान उदेशीका देऊन मनुस्मृती दहन दिन व स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.महिला स्वतंत्र दिनाच्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मानसिक आणि शारीरिक गुलामीतून महामानव, विश्वरत्न,महान घटनाकार,डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मानुसकीला घातक असलेली थोतांड मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याशी जाळून समस्त भारतातील स्त्रियांची आणि बहुजनांची मनूच्या महाभयंकर अश्या कायद्यातून आणि गुलामगीरीच्या बंधनातून कायमची मुक्तता केली.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी पालघर मा.डॉ.किरण महाजन साहेब.मुख्ख कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,पालघर मा.सिध्दाराम सालीमठ साहेब.उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.पालघर मा.सदानंद जनाटे साहेब.अपर पोलिस अधीक्षक पालघर मा.प्रकाश गायकवाड साहेब.पोलिस उप अधीक्षक (गृह)मा.शैलेश काळे साहेब.यांना किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक-किरण जगताप मॅडम आणि किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट अध्यक्ष.अमर जगताप साहेब संस्थेमार्फत संविधान उदेशीका देऊन साजरा करण्यात आला.आम्ही संविधानला मानतो व आम्ही कायदा सुव्यवस्थेचा आदर करतो.असे किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक-किरण जगताप मॅडम यांनी सांगितले.समस्त महामानवांचे स्वप्न प्रत्यक्षात खरे केले.
म्हणून आजचा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.या महान क्रांतीकारी दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.मनुस्मृती दहन दिन.व महिला स्वतंत्र दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय सदिच्छा.जय संविधान.जय भारत.