चोंडी येथील कोलाम पोडावर वाचनालयाचे लोकार्पण
बाभूळगाव:- तालुक्यातील चोंडी येथे क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच विध्यमान शिक्षण पध्दतीच्या स्पर्धेमध्ये गावातील प्रत्येक विध्यार्थी उच्च पदावर जाऊन गावातील घराघरात शिक्षणाचे पोषक वातावरण राहावे या उद्देशाने युवकांच्या पुढाकारातून चोंडी येथील कोलाम पोड चावडी येथे वाचनालय व ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. गंगाधर आत्राम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.दशरथ जांभुळकर डी वाय एस होते, कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री विनोद वाडेकर, मुंबई उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.लक्ष्मणराव भिवनकर, श्री उत्तम मोहरे, श्री.गोपाळ घोटी,निलेश पिपरे, शंकर उकंडे,गजानन राऊत,निलेश रोठे,अमित ढोबळे,शैलेश गुल्हाने,पाडसिनेकून सर, राहुल चिंचघाटे,अंकुश कासारकर,देवा अंबेकर,चोंडी येथील सरपंच आरती ताई कदम,संदीप कदम,सागर कदम, अमित कदम,हर्षल काटे,संजय मोहिते,राजु मोहिते,शैलेश कदम,हनुमंत जगताप,
आदि मान्यवर उपस्थित होते.
विनोद वाडेकर यांनी मार्गदर्शनामध्ये विध्यार्थ्यांना एकच ध्यास, फक्त अभ्यास असा कानमंत्र देऊन पालकांनी मुलांना जास्तीत जास्त उच्च शिक्षित करून चोंडी गावची ओळख अधिकाऱ्यांचे गाव व्हायला पाहिजे अशी वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणात श्री दशरथ जांभुळकर साहेब यांनी मी गावचा सुपुत्र असल्याने वाचनालय गावात चालू झाले आहे
म्हणजे आजपासून पुनः नव्याने प्रगतीच्या दिशेने नव्या उमेदीने गावच्या विकासाची वाटचाल चालू झाली असून विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा अभ्यास करावा त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले..सोबतच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
ग्रंथालयाला श्री.शालीक टेकाम साहेब, श्री.मधुकर मोरझडे सर, श्री विनोद वाडेकर,सौ.रंजना चांदेकर मॅडम यांनी पुस्तके भेट दिली.
वाचनालयासाठी पुढाकार घेणारे गावचे उपसरपंच श्री.अंकुश ढोबरे, प्रेमराज मांगुळकर,निलेश मोहिते,संदीप कदम,कांता जांभुळकर
आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा मानकर या विद्यार्थ्यांनीने केले तर कार्यक्रमासाठी अंकुश ढोबरे ,प्रेमराज मांगुळकर, संदीप कदम, निलेश मोहिते ,शुभम राजुरकर ,सुधाकर राजुरकर ,उत्तम घोटेकर ,संदीप राजुरकर ,अमित जांभुळकर ,उत्तम ढोबरे, वसंता राजुरकर ,गणेश मांगुळकर,संजय पिंपळकर,मनोज पिंपळकर,दुर्यधन वाडेकर,गुरुदेव देवतडे, वैभव मांगुळकर,यांनी परिश्रम घेऊन कार्यरक्रम यशस्वी रित्या पार पाडला..