मुंबई वाहतूक विभाग डी बी मार्ग येथिल भ्रष्टाचार कारभारा बाबत तक्रार
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मा.मुख्य न्यायाधीश साहेब उच्च न्यायालय मुंबई
श्री.उद्धवजी ठाकरे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
महोदय
मुंबई: मी सुनील भगवंतराव टोके (24004) सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई मुख्य नियंत्रण कक्ष आपल्या सर्वांना जय हिंद !!.
सर्व मान्यवर व डी बी मार्ग वाहतूक विभाग मुंबई येथील सद्याचे मा.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.खिलारे आपणांस मी नम्र विनंती करतो करतो की दिनांक 05/01/2022 रोजी अंदाजे 19 :10 वाजवण्याच्या सुमारास मी डी बी मार्ग वाहतूक विभाग मुंबई येथील मा.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री खिलारे यांच्या शासकीय कार्यालयात त्यांच्या वाहतूक विभागात होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची व तो कोणत्या कॅशियर पोलीस अंमलदार यांच्या माध्यमातून होत आहे याची गुप्त माहिती देण्या करता समक्ष हजर होऊन सुद्धा संबंधित डी बी मार्ग वाहतूक विभागाचे सद्याचे मा.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री खिलारे यांनी माझी भेट घेण्याचे जाणीव पूर्वक टाळले?अर्थात असे अनेक अनुभव मी मुंबई वाहतूक विभागातील आजी माजी पोलीस सह आयुक्त ते अगदी मा.पोलीस उप आयुक्त ते सर्वच पदांवरील पोलीस अधिकारी यांच्या अनास्थेतून आजही अनुभवत आहे कारण हे सर्व जण यांच्या विभागातील भ्रष्टाचार कारभाराचे नक्कीच हिस्सेदार आहेत याचाच प्रत्यय दिनांक 05/01/2022 रोजी ही मी घेतला आहे.
असो डी बी मार्ग वाहतूक विभागात पोलीस अंमलदार कॅशियर व टोविग गाड्या वरील पोलीस कर्मचारी हे सदर विभागातील कॅशियर पोलीस अंमलदार यांच्या लिस्ट मधील चार चाकी गाड्या व मोटार सायकल दु चाकी कारवाई करता डी बी मार्ग वाहतूक विभाग कार्यालयात टोविग करून न करण्या बाबत बेकायदेशीर आदेश कसे देतात याचे इत्यभूत योग्य पुरावे मी नक्कीच गोळा केले आहेत.
डी.बी मार्ग वाहतूक विभागातील सद्या टोविग व्हॅन वरील पोलीस नाईक तुकाराम जाधव यांनी विदर्भ इन्फोटेक प्रा.ली.कंपनीच्या टोविग व्हॅन वरील खाजगी चालक प्रजापती यांचे मोबाईल वरून मला जीवे मारण्याच्या कश्या धमक्या दिल्या याचे इत्यभूत ध्वनी मुद्रण मी मुंबई वाहतूक विभाग प्रमुख श्री राजवर्धन मा.पोलीस सह आयुक्त यांना व इतर वरिष्ठ अधिकारी यांना ई मेल माध्यमातून पाठवले होते तसेच सदर विभागाचे प्रपोनी श्री खिलारे यांना ही समक्ष भेटून ऐकवले होते या प्रकरणात दक्षिण वाहतूक विभाग मा पोलीस उप आयुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे यांनी माझा लेखी जबाब दिनांक 30/11/2021 रोजी नोंदण करून प्रकरण दाबून ठेवले.
या सर्व गंभीर भ्रष्टाचार व जीवे मारण्याच्या धमक्या बाबत सविस्तर पुरावे देऊन ही सदर विभागाचे सनदी अधिकारी व प्रपोनी श्री खिलारे यांनी पोलीस नाईक तुकाराम जाधव व खाजगी इसम प्रजापती यांना बेकायदेशीर पणे साथ देऊन स्वतःचा आर्थिक विकास करण्याचे धोरण राबवले आहे सदर वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभाराचे दरमहा वसुली बहाद्दर पोलीस कर्मचारी जाधव यांच्या भ्रष्टाचार कारभाराची गुप्त माहिती मी सदर विभागाचे सद्याचे प्रपोनी श्री खिलारे यांना देण्याचा प्रांजळ प्रयत्न केला परंतु भ्रष्टाचार कारभारात लिप्त असणारे मुंबई वाहतूक विभागातील अगदी मा पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन किंवा त्यांच्या पदांपासून पोलीस शिपाई पदांवरील भ्रष्टाचार कारभारात लिप्त असणाऱ्या शासकीय लोक सेवक यांना वेळच नाही कारण महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार हेच या भ्रष्टाचार करणारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
असो ठाणे, नवी मुंबई वाहतूक विभागातील करोडो रुपयांच्या दरमहा वसुली प्रकरणांत मी मे उच्च न्यायालय मुंबई यांच्या कडे नव्याने याचिका दाखल करून जनहितार्थ न्याय मागत असून त्याची न्यायालयीन सुनावणी आज दिनांक 06/01/2022 रोजी आहे इतर सुनावणी दरम्यान मी मुंबई वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभारातील लिप्त मा.पोलीस सह आयुक्त श्री राजवर्धन व गँग चे योग्य पुरावे नक्कीच सादर करणार आहे. वास्तविक पाहता हे पोलीस दलातील सनदी अधिकारी जे भ्रष्टाचार कारभारात, गुन्हेगारी कृत्यात सहभागी आहेत याना सन्माननीय उच्च न्यायालयाची व कायद्याची भीती नक्कीच राहिली नाही हेच माझ्या अनेक जनहित याचिकेतून उघड झाले आहे जय हिंद सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई पोलीस दल.
टीप हे सर्व जनहितार्थ वायरल करण्याची माझी मानसिकता मनापासून नसताना सुद्धा या करता वायरल करत आहे की पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभारातील लिप्त सनदी अधिकारी व त्यांचे हितचिंतक हे महाराष्ट्रातील इलेट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्या मालक संपादक बातमीदार याना माझ्या बाबत बदनामीकारक माहिती,अश्लील शिवीगाळ करत असल्या बाबतचेही योग्य पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत.