भाटपुरा विद्यालयात लसीकरण
भाटपुरा शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना तानाजी दौलतराव पाटील माध्यमिक विद्यालयात लसीकरण करण्यात आले. विद्यालयात जवळपास शंभर विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
गावातील तानाजी दौलतराव पाटील माध्यमिक विद्यालयातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गावातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचेही लसीकरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य विभागाचे होळनांथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन.चव्हाण,आरोग्य सहाय्यक उमेश निकम,प्रवीण सोनवणे,परिचारिका मीना गावित,आशा कार्यकर्त्या शोभा माळी,कीर्ती करंकाळ, मंगलबाई कोळी,प्रतिभा खैरनार, बेबीबाई राठोड तसेच सरपंच ललिता श्रावण चव्हाण, उपसरपंच रोशन सोनवणे, विद्यालयाच्या
मुख्याध्यापिका एम.ए.पाटील,व्ही.वाय.पाटील,ए.ई. ईशी, जे.बी.जैन , ए. बी बागल , बी. एन. पाटील, एम. एच. माळी, आर. एस. राठोड, भरत पाटील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.