अहो साहेब निर्बंध कडक करा पण लॉकडाऊन नका लावा बरं…
शेतकरी, व्यापारी नागरिक ,लॉकडाऊनच्या भीतीने धास्तावले
त-हाडी प्रतिनिधी
दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या कोरोनाने महाराष्ट्र राज्यात आपले पाय पसरायला सुरवात केली आहे, राज्यात मुबंई, ठाणे नाशिक सह धुळे जिल्ह्यातील कोरोनाची दिवसागणिक वाढती संख्या लक्षात घेता शासन कोणत्या क्षणी लॉकडाऊनची घोषणा करेल याचा अंदाज नसल्याने शेतकरी, व्यापारी यांनी धास्ती घेतली आहे शासनाने हवे तर निर्बंध कडक करावे पण लॉकडाऊन नको अशी मागणी करत आहे
सलग तिसऱ्या वर्षी जानेवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, जानेवारी महिन्यात कांदा, रब्बी हंगाम सुरु होतो लॉकडाऊन झाले की निर्यात थांबते, स्थानिक बाजारात कांदा कवडीमोल भावात विकली जातात शेतकऱ्यांचा खर्च वसूल होत नाही, चार महिने सांभाळून लाखो रुपये खर्च होऊन जातो चार महिने खर्च करून हाती आलेले पीक वाया जाते, लॉकडाऊनची भीती असल्यामुळे व्यापारी माल खरेदी करत नाही, घेतला तरी तो विक्री होण्याची शाश्वती नसल्याने कवडीमोल भावात विकावा लागतो मागील दोन वर्ष सातत्याने कांदा पीक तोट्यात गेले, वर्षभर खर्च करून खर्च सुद्धा वसूल होत नाही शिवाय भांडवलासाठी काढलेले कर्ज फेडणार कसे, कुटुंब, मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी पुन्हा बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात यामुळे सातत्याने कर्ज वाढत आहे शेतकरी, व्यपारी अडचणीत येतात त्यामुळे शासनाने भलेही निर्बंध कडक करावे पण लॉकडाऊन करू नये या मागणीने जोर धरला आहे तरुण शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात आवाज उठवला आहे
शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील छोटे व्यवसायिक सुद्धा लॉकडाऊन सुरु झाले की अडचणीत येतात नागरिक घराच्या बाहेर पडत नाही नोकरीं, व्यवसाय थांबतो सगळेच ठप्प होते त्यामुळे नागरिक अडचणीत येतात दुकानातील खरेदी बंद होते व्यापारी, व्यावसायिक अडचणीत येतात
चौकट
शेतकऱ्यांना सातत्याने कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाने ग्रासले आहे त्यात कोरोनामुळे दोन वर्ष शेतीमाल तोट्यात विकला गेला कांदा कवडीमोल भावात विकली, दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर फेकली गेली, कर्ज वाढत गेले आज आर्थिक अडचण काढून पुन्हा एकदा कांदा बहरली आहे अवघ्या काही दिवसात चार पैसे पदरात पडणार आहे अशा परिस्थितीत शासनाने लॉकडाऊनचे फर्मान काढले तर शेतकरी पुरता संपून जाईल त्यामुळे हवे तर निर्बंध कडक करावे पण लॉकडाऊन करू नये
युवराज पुज्जु सोनवणे शेतकरी त-हाडी
लॉकडाऊनच्या भीतीने दोन वर्ष व्यवसाय अडचणीत आले आज चार महिन्यापासून कुठेतरी दुकान सुरळीत सुरु झाले आहे दोन वर्ष अडचणीत गेले त्यामुळे सगळेच व्यवसाय डबघाईत गेले होते आत्ता सावरण्याची वेळ आली तोच लॉकडाऊन झाले तर मोठी झळ पोहचेल म्हणून लॉकडाऊनची परिस्थिती टाळावी
जयश्री सुनिल धनगर सरपंच त-हाडी