पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल येथे कोरोना लसीकरण अभियानास सुरुवात
त-हाडी प्रतिनिधी:
शिरपूर येथील पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला.15 वर्षांपुढील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
कोरोना संसर्गापासून बालकांचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण अभियान हाती घेतले आहे. या अभियानात पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के. पी. कुळकर्णी यांनी लसीबद्दल शंका दूर करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी जी. पी. कुमावत, लसीकरण पथकाचे डॉ बिनल पटेल,डॉ भूपेश माहेश्वरी, समाधान पाटील,कविता कोळी, प्राचार्य के. पी. कुळकर्णी,पर्यवेक्षक के. एन. काजी, एम. एम. बैसाणे,कार्यालयीन अधिक्षक जे. बी. जाधव ,व्ही. टी. माळी, वर्गशिक्षक एस. डी. माळी, एस. जे .पावरा, एस .एस. धाकड, ए. के. गुजर, व्ही. पी. सोनवणे, जे .जी. महाजन, वाय. एन. गिरासे, आदी उपस्थित होते.







