पाटोदा बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
पाटोदा ;
-श्री बंकट स्वामी शिक्षण संस्थेच्या खडकी घाट येथील बंकटस्वामी विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त “ध्वजारोहण” संजय सावंत सर (मुख्याध्यापक) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील डॉ.शेख त्यांचे सहकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकीघाटच्या मुख्याध्यापिका श्रीमती रिंगणे मॅडम व त्यांचे सहकारी श्रीमती सुलोचना जाधव , राठोड सर, तसेच अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका बोराडे काकू तसेच गावातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वर्ग तरुण वर्ग व काही प्रमाणात महिलावर्ग तसेच बंकटस्वामी विद्यालयातील शिक्षक वृंद श्री उंदरे सर श्री रिंगणे सर श्री सुपेकर सर श्री मोरे सर श्री खाकरे सर श्री आनेराव सर श्री कुरे सर श्री मांजरे सर श्री बनसोडे सर श्री भोसले सर श्री कानडे आणि वर्ग दहावीचे विद्यार्थी कोरोनाचे नियम पाळून सर्वजण उपस्थित होते.







