*72 वा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो*
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे विविध शासकीय कार्यालयात ध्वाजारोहन संपन्न झाला
ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात आणून एक स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून निर्माण झाले २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आणून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरवात केली होती म्हणून २६ जानेवारी हा दिवस देशभर ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणुन साजरा केला जातो.सुरवातिस सविधान प्रतीचे वाचन करून, त-हाडी ग्रामपंचायत प्रगंणात येथील ध्वजारोहण उपसरपंच उजनबाई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कै आण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयात त-हाडी येथील ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष निंबा भामरे यांच्या हस्ते करण्यात आले आणि कै. साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी स्काऊट गाईडचे ध्वजारोहण अमोल बागुल यांच्या हस्ते करण्यात आली तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा त-हाडी येथील ध्वजारोहण माजी उपसरपंच गणेश भामरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते







