डॉ. कमल दणाणे यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा चा लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार ‘ बाबुराव गायकवाड यांचे कादंबरी लेखन ‘ या डॉ.कमल दणाणे यांच्या समीक्षा ग्रंथाला प्रदान करण्यात आला.
पुणे विद्यापीठाचे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ
अध्यासन आणि मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, विवेकवादी साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर
होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड़मय पुरस्कारार्थींमध्ये मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. बळीराम गायकवाड, समरसता साहित्य परिषदेचे रविंद्र गोळे, दादासाहेब सोनवणे, डॉ. उज्वला हातागळे, डॉ. सुशील चिमोरे, डॉ. बालाजी समुखराव, अॅड. श्रीधर कसबेकर, संपत जाधव, प्रा. वैजनाथ सुरनर, सतिश नाईकवाडे आदींसह ३४ साहित्यकृतींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांनी केले, सूत्रसंचालन मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. विजय रोडे यांनी केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड.मय पुरस्कारची निवड प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड.मय पुरस्काराची निवड करण्यात आली.