मायणी येथे जवान विजय दळवी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान
मायणी :- सतीश डोंगरे
भारतीय सैन्यदलात प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले जवान विजय दळवी यांचे मायणी येथील पुनर्वसित गाव बोपोशी याठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत विविध संस्था व मान्यवरांकडून करण्यात आले. भारतीय सैन्य दलात गेली एकोणीस वर्ष सेवा बजावून निवृत्त झाले .त्या निमित्ताने सेवानिवृत्त जवान विजय दळवी या सन्मानाने भारावून गेले.
या सत्कार प्रसंगी बोलताना जवान विजय दळवी म्हणाले, माझे वडील मुगुटराव दळवी व थोरले बंधू भरत मुगुटराव दळवी यांनी भारतीय सैन्य दलात सेवा बजावून निवृत्त झाले .सैन्य दलात सेवा बजावत असताना मला माझ्या वडीलांचीआणि थोरले बंधू यांची प्रेरणा व कुटुंबाची साथ मिळाली . मी पंजाब, बिहार, युपी, जम्मूकश्मिर, सिरिया, इस्रायल, युनायटेड नेशन मध्ये सेवा बजावली . भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना अनेक चांगले,वाईट अनुभव आले .परंतु जीवाची पर्वा न करता,देशसेवा केली आणि ते माझे कर्तव्य आहे .देशसेवा ही सर्वांच्या मनात असली पाहिजे .असे प्रतिपादन जवान विजय दळवी यांनी केले .
यावेळी भूमाता ब्रिगेडचे अमोल भिसे म्हणाले, भारतीय सैन्य दलात अनेक संकटांना सोमोरे जाऊन देशाचे रक्षण करणारे जवान भारत मातेचे भूषण असतात त्यांच्या कर्तव्याला आणि शौर्याला आमचा सलाम . जवान विजय दळवी याना भावी वाटचालीस शुभेच्छा.
पुनर्वसन (बोपोशी)मायणी याठिकाणी आयोजित या कार्यक्रमात जवान विजय दळवी यांचे जि.प सदस्य सुरेंद्र गुदगे, मार्केट कमिटी माजी संचालक दादासो कचरे,प्रकाश कणसे, भूमाता ब्रिगडचे तानाजी चव्हाण ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खटाव तालुका कार्यध्यक्ष सतीश डोंगरे,शिवसेनेचे पदाधिकारी विशाल चव्हाण, भारत डिजीटलचे राजाराम जाधव, कृष्णत दळवी, संतोष काटे, संतोष शिर्के, भानुदास दळवी, संपत पवार,कांबळे टेलर, नंदू कांबळे, प्रमोद पाटोळे, अजिंक्य तरुण मंडळ,बोपोशी पुनर्वसन गावकमिटी व ग्रामस्थांकडून जवान दळवी यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मायणी भागातील सर्व सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला.यावेळी खटाव तालुका अध्यक्ष.संतोष डांगे,पत्रकार स्वप्नील कांबळे मनोगत व्यक्त केले. सदर वेळी उपस्थितांचे आभार बाजीराव पवार यांनी केले.