डोंगरगाव परिसरात महावितरणचा भोंगळ कारभार संतप्त शेतकरी तिव्रआंदोलनाच्या तयारीत* =
===============================
डोंगरगाव( प्रतिनिधी )आर आर पाटील= गेल्या एक महिन्यापासून येथील वाघाडी फिडर थ्री फेज लाईट सुरळीत रेगुलर चालत नाही या बिड़रवर वाघाडी खुर्द, वाघाडी बुद्रुक, डोंगरगाव, कंचनपुर ,इत्यादी गावे येतात या फिड़रवर सप्लाय सोनगीर सब टेशन वरून येतो
सुमारे एक महिन्यापासून सतत त्रिपिंग येणे, डिओ टूटने, फ्युज तुटणे ,डीपी जळणे ,तारा तुटणे, लाईट तासन तास बंद राहणे ,इत्यादी अनेक विविध कारणांमुळे शेती पिकांना पाहिजे त्या वेळेस पाणी देणे शक्य होत नाही मध्येच थकित वीजबिलमुळे ग्राहकांच्या शेतातील डीपीचे कनेक्शन कट करण्यात आले या घटनेला घाबरून बऱ्याच शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात वीज देयके सुद्धा काही प्रमाणात भरलेले आहेत
आत्ताच हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर फार मोठी भर देण्यात आलेली आहे तरीदेखील याठिकाणी गम्भीर परीस्तीथी आहे विजेअभावी शेतकरी आपल्या दरडोई उत्पन्नास मुकणार आहेत यास जबाबदार म्हणून वीज कंपनीत असणार आहे कारण शेतात विहिरींवर वीज नसल्याने पिकांना पाहिजे त्यावेळेस पाणी देता येत नाही
सहाजिकच शेती उत्पादनात घट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत यापूर्वी दैनंदिन आठ ते दहा तासिका इलेक्ट्रिक लाईट येत होती आता मात्र दैनंदिन दोन ते चार तास या व्यतिरिक्त लाईट येतच नाही मग शेतकर्यांनी जायचे कुठे? हि मोठि अडचण शेतकऱ्यांसमोर घेऊन ठेवलेली आहे काही दिवसात यासंदर्भात योग्य ती उपाययोजना न झाल्यास परिसरातील डोंगरगाव, वाघाडी खुर्द, वाघाडी बुद्रुक, कंचनपुर ,येथील असंख्य शेतकऱ्यां स ह जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील तीव्र आंदोलन उभारणार आहेत