• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

१३ फेब्रुवारी @जागतिक लग्न दिवस

माणगंगा by माणगंगा
February 13, 2022
in महाराष्ट्र
0
१३ फेब्रुवारी @जागतिक लग्न दिवस

@ १३ फेब्रुवारी @
जागतिक लग्न दिवस

त-हाडी प्रतिनिधी
आज जागतिक लग्न दिवस !

फेब्रुवारीचा दुसरा रविवार
जागतिक लग्न दिवस

दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक लग्न दिवस साजरा केला जातो.

लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टी मधून प्रेम जन्म घेतं. संसारात अडचणी असणारच आणि त्याचे क्लेश होतात तेव्हा साथीदार लागतो. तसा साथीदार जोडीदाराच्या अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं.

आज एवढी वर्षे झाली, अजूनही एका प्रश्नाचा खरा उलगडा होत नाही. लग्नाच्या वयाचे हजारो मुलगे आणि हजारो मुली आसपास आहेत. पण आपल्याला हवा तसा जोडीदार मात्र शोधणं इतकं बिकट आहे की त्याचं वर्णन करणं कठीण आहे.लग्न कशासाठी हे ज्याला नीट कळलं त्याला पुढच्या निर्णयातला बराचसा भाग सोपा होतो.

यावर मी चालवतो त्या ‘जीवनसाथ’ अभ्यास मंडळात बऱ्यापैकी सविस्तर चर्चा चालतात. आत्ता मात्र मी त्या चर्चाचा केवळ सारांश सांगतो. ‘कायद्यात बसणाऱ्या, समाजमान्य पद्धतीने एक सज्ञान स्त्री आणि एक सज्ञान पुरुष यांच्यात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी’ हे त्याचं उत्तर आहे.

आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. कोणाशी लग्न करायचं हा निर्णय घेताना जी मुख्य गोष्ट समजायला हवी ती अशी, ‘स्वत:च्या कुवती प्रमाणे, उपलब्ध व्यक्ती पैकी, उपलब्ध वेळेत, त्यातल्या त्यात चांगल्या जोडीदाराची मी स्वत: निवड केली आहे. सर्व ताकद वापरून मी हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न करीन. काही ताण आले तर मार्ग काढण्याचा सगळा प्रयत्न करीन.’ दुसऱ्या कोणी तरी मंत्र म्हणण्या पेक्षा यातला प्रत्येक शब्द नीट समजावून घेतला तर ते उपयोगी पडेल. हे ऐकल्यावर अनेक जण म्हणतात, ‘हे सोप्या भाषेत आहे, पण सोपं नाही’.

हा हेतू स्पष्टपणे कळलेला असला की निर्णय सोपा होतो. ज्या जोडीदाराशी भावनिक, वैचारिक जवळीक असेल त्याच व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे, तरच समाजमान्य आणि तरीही मनपसंत पद्धतीने शारीरिक संबंध शक्य आहेत. भावनिक, वैचारिक जवळीकीसाठी बराच वेळ लागतो. त्या काळात दोन तीन भावी जोडीदारांशी एकाच काळात चर्चा भेटी चालू असल्या तरी काही बिघडत नाही. प्रत्यक्षात असंच होत असतं, पण ते उघडपणे कोणी मान्य करत नाही.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, एक स्त्री आणि एक पुरुष लग्नाच्या करारावर सह्या करतात तेव्हा ते दोन न लिहिलेल्या अटींवर सह्या करत असतात. एक म्हणजे यापुढे त्यांची पैशाची भागीदारी गृहीत असते. संसार या ‘बिझनेसचे ते पार्टनर’ होतात. म्हणजेच फायदा किंवा तोटा ते विभागून घेतात आणि फक्त एकमेकांशीच शरीर संबंध करण्याचं बंधन पाळण्याचा करार करतात.

वाईट गोष्ट अशी आहे की, अनेक पुरुषांच्या मनात अशी छुपी इच्छा असते की लग्न केलं की बायकोवर स्वामित्व गाजवता येईल. त्यांना हे समजत नाही की, कोणाचाही स्वामी बनून गळ्यात माळ घालून घेतली की त्या माळेत जबाबदारीचे मणी असतात. आणखी एक गोष्ट ऐकली की मला फार वाईट वाटतं. बिघडलेला, मंदबुद्धी, नाकर्ता, व्यसनी असा मुलगा पदरी असलेले आईवडील चक्क असा विचार करतात की, याचं लग्न करून देऊ म्हणजे हा सुधारेल. लग्नामुळे असा मुलगा सुधारल्याचं उदाहरण लाखात एक असतं. मुलीच्या आयुष्याची वाट लागते त्याचा विचार कोणीच करत नाही. काही ठिकाणी अशा मुलाच्या आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांना स्पष्ट परिस्थिती सांगितलेली असते, पण मुलीला बिचारीला काही माहीत नसतं. आणि अशा तऱ्हेने झालेली लग्नं टिकतातही. कहाणीचा त्याच्या पुढचा भाग ऐकून तर माझा थरकाप होतो. लग्नामुळे मुलगा सुधारत नाही कळल्यावर पुढे सगळे मिळून ठरवतात की, मूल होऊ दे म्हणजे तो सुधारेल. बापरे! म्हणजे पुढे त्या मुलाचेही हालच हाल. त्या जन्मलेल्या मुलाच्या मनात वडिला विषयी काय भावना असतील, त्याची आपण सगळे कल्पना करू शकतो.

लग्न कशासाठी, याची समज येण्यासाठी आणि त्याचं अवलंबन करण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. विचारस्वातंत्र्य हवं आणि तरी विश्वास हवा. या दोन गोष्टी मधून प्रेम जन्म घेतं. संसारात अडचणी असणारच आणि त्याचे क्लेश होतात तेव्हा साथीदार लागतो. तसा साथीदार जोडीदाराच्या अडचणीच्या वेळी हजर असला तर लग्न कशासाठी ते नीट कळतं.

लग्नाचा एक महत्त्वाचा उद्देश क्रीडा असा असतो. क्रीडा म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही तर सहवासाचा आनंद. दोन इंग्लिश शब्द ‘प्ले’ आणि ‘गेम’ आहेत. त्याचा अर्थ खरं म्हणजे स्पष्ट आहे. ‘प्ले’ म्हणजे क्रीडा व ‘गेम’ म्हणजे नियमांच्या आधारे केलेली स्पर्धा. त्यात हार जीत असते. क्रीडेत हार जीत नसते. फक्त आनंद असतो. ही गोष्ट नवरा बायकोला समजणं जरुरीचं आहे.

लग्न कशासाठी, याचं उत्तर देताना एक जण म्हणाला होता, ‘लग्न म्हणजे थ्री इन वन आहे. सोय, शरीरसंबंध आणि आधार.’ जणू काही ‘सोफा कम बेड कम सेटी’. कितीही विनोदी वाटलं तरी हे खरं आहे. फक्त तो सोफा नीट वापरण्याची अक्कल हवी. त्याचा ‘मेंटेनन्स’ हवा.

जोडीदाराची निवड करताना योग्य वय काय असावं, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. १४-१५ व्या वर्षी वैद्यकीय दृष्टया स्त्री आणि पुरुष दोघंही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी योग्य झालेले असतात. त्यामुळे तेही उत्तर सोपं आहे. कायद्याचं उत्तर फार स्पष्ट आणि आकड्यामध्ये आहे. मुलीचं वय १८ पूर्ण आणि मुलाचं २१ पूर्ण. निसर्गरचना, वैद्यकीय कल्पना आणि कायद्याची कल्पना यामध्ये इतका फरक असण्याचं मुख्य कारण वैचारिक, भावनिक परिपक्वता कायद्याला अभिप्रेत आहे. आणि तिथेच खऱ्या प्रश्नाला सुरुवात होते. ‘परिपक्वता!’ किती मोघम, मोठी, पसरट कल्पना आहे.

पुरुष स्त्री पेक्षा मोठा असावा हे लोकांच्या डोक्यातून जात नाही. परिपक्वतेचा विचार केला तर ते बंधन मानण्याची जरूर नाही. परिपक्वता किती वयात येते हे सागणं कठीण आहे. पण जोपर्यंत पालक आपल्या मुला मुलींच्या लग्नाचा निर्णय घेतात तोपर्यंत त्याला बालविवाहच म्हटलं पाहिजे. इतर कशाचीही ‘प्रॅक्टिस’ करायला लोक ५-१० वर्ष कॉलेज मध्ये जायला तयार असतात. डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स अनेक वर्ष शिकतात आणि मग ‘इंटर्नशिप’ करतात. ‘संसार’ या महत्त्वाच्या ‘प्रॅक्टिस’ साठी मात्र निर्णय घ्यायला काही तास किंवा काही मिनिटं दिलेली असतात. त्या काही मिनिटांत त्यांचं म्हणणं असतं की, आम्हाला नुसता स्थळाचा पत्ता द्या. बाकी काही शिकवू नका. पुढे काय करायचं ते आम्हाला सगळं माहितीय.

खरी गोष्ट अशी की, नॉर्मल मुलाला किंवा मुलीला साधारण २ वर्षांत जोडीदार सापडत नसेल तर कुठे तरी काही तरी चूक आहे. ती चूक शोधायला हवी आहे. मी कितीही म्हणालो ज्यांनी त्यांनी स्वत: निर्णय घेऊन जोडीदार निवडावा आणि पुढे स्वत:च्या हिमतीवर संसार निभावून न्यावा, तरी कुठे होतंय् तसं? जोडीदाराची निवड करण्यासाठी लोकांना आईवडिलांची नाही तर वधूवर सूचक मंडळांची मदत लागतेच आहे.

स्वत:चा जोडीदार स्वत: निवडू न शकणारे असतात तसेच स्वत: निर्णय घेण्याची इच्छा नसलेलेही असतात. त्यांनी मनाशी केलेलं विधान असं असतं, ‘बरोब्बर मला पाहिजे तशी व्यक्ती लग्न करण्यासाठी दुसरं कोणी तरी शोधून देईल आणि मग त्यामुळे माझा संसार आपोआप सुखाचा होईल’. छोट्या गावांमध्ये, पुणे मुंबई खेरीज महाराष्ट्र भरातल्या मोठ्या शहरांत मुलींच्या विचारात बऱ्यापैकी फरक आढळतो. मुलाच्या श्रीमंती विषयी तर्क चालू असतात. पोशाख, शिक्षण, वाहन, कामाचं ठिकाण, बरोबरीची मुलं याविषयी अंदाज बांधणं चालू असतं. वडील काय करतात, मालमत्ता किती, शेती किती, याची छोट्या गावांत सबंध गावाला मुळात माहिती असतेच. शहरात सगळ्यांचाच पोशाख आधुनिक असतो. राहणीवरून काही पत्ता लागत नाही. त्यामुळे व्यवसाय, नोकरी याबद्दलची माहिती आवश्यक ठरते. वधू-वर सूचक मंडळांच्या जाहिराती बघितल्या की, ‘क्रॉस सेक्शन’ ची माहिती समजते. त्यात मुलाचा ‘पगार’ हाच महत्त्वाचा मुद्दा असतो.

अभ्यास मंडळात एका गोष्टीची नेहमी चर्चा चालते. लग्नाच्या वयात एखाद्या मुलाची श्रीमंती आवडली तर ती त्याची स्वत:ची कमाई कशी असेल? खरी परीक्षा त्या मुलाकडे श्रीमंत होण्यासाठी लागणारे गुण आहेत की नाहीत, हे नको का असायला? आईवडील काय शिकले, काय करतात, किती पैसे मिळवतात, यावरून आईवडिलांचा आर्थिक स्तर कळायला मदत होते खरी; पण मुलाची धमक कशी कळणार? ‘मनी पर्सनॅलिटी’ कशी कळणार? जिथे तो मुलगा काम करत असेल, तिथल्या त्याच्या सहकाऱ्यांशी बोलणं, हे मला खूप गरजेचं वाटतं.

पूर्वीचं त्रिसूत्र ‘अन्न, वस्त्र, निवारा’ होतं आणि त्या तीनही गोष्टी म्हणजे एकत्रितपणे चरितार्थाची सोय असं म्हणून आधुनिक त्रिसूत्री आपण कशाला म्हणतो आहोत हे स्पष्ट करू या. ‘चरितार्थ, लैंगिक स्वास्थ्य आणि सन्मान’ ही नवी त्रिसूत्री. ज्यांना हे मी म्हणतोय ते मान्य नाही असे खूप जण असणारच आहेत. पण तेही मला मान्य आहे ना.

Views: 212
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
1923 चा रेडिओ आजही दिसतो चिरतरूण(13फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस)

1923 चा रेडिओ आजही दिसतो चिरतरूण(13फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)