आधुनिक युगातही रेडीओला आले सुगीचे दिवस ;
पारांवर चर्चेत आकाशवाणीचा सहभाग , लोडशेडिंग काळात रेडीओचा वापर
त-हाडी ( महेंद्र खोंडे ) दि
आधुनिक युगात देश तंत्रज्ञानात प्रगती करत असतां अनेक जण आपल्या मोबाईलवर चॅनल बातम्या , ई पेपर अदिच्या माध्यमातुन माहितीची देवाण – घेवाण करत असतांना व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनेक घटना क्षणात कळते . परंतु आजही ग्रामिण भागाच्या चावडी , पारावर गल्ली बोळात बसलेले वृध्द आज रेडीओच्या माध्यमातुन माहिती मिळवून चर्चेला उधाण येत आहे . त्यामुळे अडगळीत पडलेल्या रेडीओला सुगीचे दिवस आले आहे .
आम्ही एकलेय वाचलेय की ‘जुन ते सोन असत ‘ या प्रमाणे माहिती व प्रसारणात सर्वात अगोदरचे माध्यम होते रेडिओ. आपल्या आजू बाजुला काय चालू आहे याचा आढावा तात्काऴ घ्यायचा असेल तर १९ व्या शतकाच्या सुरुवातिला सर्वात जलद माध्यम म्हणुन या आकाशवाणीच्या माध्यमाकडे पाहिले जायचे. रेडीओला फारसी किंमत नसायची शिवाय खर्चही कमी शिवाय सोबत ठेऊन आपल्याला हवे तेव्हा स्टेशन पकडुन बातम्या एकणे किवा ईतर मनोरंजन कार्यक्रम एकायचा अनेकाना छंद जणु जडला होता . जनावरांमागे शेतात जाणाऱ्या शेतकरी जणावरे संभाळतांना रेडीओ सोबत ठेवून मनोरंजन करून घेत . शिवाय कधी कधी खेड्या पाड्यात विजेचा प्रश्नही असायचा म्हणुन कमी खर्चातिल शेलवर ही तहान भागवता येत होती .
आता वृत्तपत्रासह, दुरदर्शन संचासह अनेक जलद साधणे प्राप्त झाली. काही क्षणात कोठलिही माहिती सहज उपलब्ध प्राप्त होते. परंतु आपल्याला ज्या बाबिची सवय असते किवा जे सोईचे वाटते त्या माध्यमाचा वापर करुन गरज भागविण्याची सवय जास्तित जास्त आहेत.. लागल्या आहे .परंतु या मनोरंजनात्मक राजकिय खेऴाची आवड कुनाला नसणार बातम्यातुन लेखा जोगा घेताना आढऴले.
शंभरी ओलाडलेले आनंदा गायकवाड म्हणाले की, दररोज बातम्या न चुकता चावडी चावड़ीवर, पारा पारावर, किवा जमेल तेथे एकतो.आमच्या शेवटाच्या आयुश्याला अनेक मर्यादा, अडी अडचणी परंतु आहे त्या स्थितीवर मात करित अवती भोवतीच्या बाबीचा आढावा घ्यायला आवडते. आणी सध्या तर आवडीनुसार लक्ष घालणे आलेच. एकायला कमी येते, पाहिजे तसे उमजत नाहित, शिवाय नविन राजकिय पक्ष, नव नविन उमेदवार पोरानची अवघड नावे परंतु आम्ही पार लाल बहादुर शास्त्रीजी पंतप्रधान असताना पासुन निवडनुका बघत आलो. आताही पहातोय परंतु तेव्हाची पदधत फार वेगऴी होती मग ती प्रचाराची असो की मतदानाची असो .येव्हढ्या खर्चाच्या गोस्टी पुर्वी नव्हत्या असेही त्यानी सांगीतले .एवढे मात्र खरे की या जुन्या पिढीला ज्ञान , माहिती देणाऱ्या रेडीओला मात्र सुगीचे दिवस आले हे खरे







