सोनगीर सब टेशनला डोंगरगाव परिसरातील संतप्त शेतकऱ्यांचा घेराव आश्वासन नंतर चर्चा समाप्त* =
===============================
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील =
सोनगिर सब स्टेशन अंतर्गत डोंगरगाव कंचनपुर वाघाडी खुर्द गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु गेल्या एका महिन्यापासून अजिबात विद्युत पुरवठा सुरळीत चालत नाही यामुळे शेती पिकांना पाणी देता येत नसून उत्पन्नात मोठी घट येण्याची मोठी चिन्हे आहेत म्हणून यासंदर्भात दैनिक देशदूत वृत्तात मागील आठवड्यातच वृत्त छापून आले होते वेळोवेळी अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सांगितले होते परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नसल्याने आज दिनांक 22फेब्रुवारी 2022 रोजी संतप्त शेतकऱ्यांनी सोनगीर सब स्टेशनला घेराव घातला यावेळी नरडाणा सोबत स्टेशनचे उपकार्यकारी अभियंता अस्मार साहेबसोनगीर सप्टेशन चे इंजिनीयर अहिरे साहेब यांना संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा कथन केल्या त्यानंतर जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील शिंदखेडा तालुका भाजप तालुकाध्यक्ष आरजी खैर नार सर पत्रकार आर आर पाटील माजि सरपंच अशोक पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने निवेदन सादर केले यावेळी अस्मार साहेब यांनी यापुढे विद्युत पुरवठा सुळीत ठेवू असे आश्वासन दिले यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला परंतु यापुढे विद्युत पुरवठा अखंडीत सुरळीत अशी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आशा व्यक्त केली







