रिक्तपदानी रूग्णसेवा कोलमडली
विखरण प्राथमिक आरोग्य केंद्रात १० रिक्त पदे
जागा भरण्याची मागणी
त-हाडी प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळावी याकरिता ग्रामीण भागात शासनाने लाखो रूपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहेत.परंतु ग्रामीण भागातील उभारलेले प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच कुठल्याना कुठल्या समस्यामध्ये अडकलेले पहावयास मिळत आहे. विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही अनेक रिक्त पदे असल्यामुळे रूग्णाची हेळसांड होत आहे.येथील रूग्णसेवा कोलमडल्याने रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
विखरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे एकाच कर्मचाऱ्याना अनेक कामे करावी लागत आहेत.त्यामुळे रूग्णाना वेळेवर सेवा मिळत नाही.अनेकदा कर्मचारी दुसऱ्या कामास गेल्याने रूग्णांना ताटकळत बसावे लागत आहे.अनेकदा या रूग्णालयात वेळेवर उपचार मिळत नाहीत.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ पदाना मंजुरी आहे.त्यापैकी १३ पदे हे भरलेले आहेत व १० पदे रिक्त आहेत.रूग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने येथील रूग्णसेवा कोलमडली आहे.या सदर्भात वारंवार तक्रारी करून ही येथील जागा भरल्या जात नाहीत.त्यामुळे नागरिक आता आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
प्रतिक्रीया……
रिक्त पदा विषय वरिष्ठाना वेळोवेळी माहीती पाठवत आहोत.कमी कर्मचारी वर्ग आसल्याने आधिक ताणही पडत आहे.
:- डॉ प्रताप पवार,वैद्यकिय आधिकारी विखरण
पदाचे नाव-
आरोग्य साहय्यक पुरुष
मंजुर पदे १
रिक्त पदे ०
भरलेली पद -१
आरोग्य साहय्यक स्त्री
मंजुर पदे -१
रिक्त पदे-१
भरलेली पद-०
औषधी निर्माण अधिकारी
मंजुर पदे-१
रिक्त पदे ०
भरलेली पद-१
ओ.पी.डी. एक.एन एम.
मंजुर पदे-१
रिक्त पदे-०
भरलेली पद-१
आरोग्य सेवक
मंजुर पदे -४
रिक्त पदे-१
भरलेली पद- ४
आरोग्य सेविका
मंजुर पदे -७
रिक्त पदे- ३
भरलेली पद-४
कनिष्ठ सहाय्यक
मंजुर पदे -१
रिक्त पदे-०
भरलेली पद-१
परिचय
मंजुर पदे-५
रिक्त पदे-४
भरलेली पद-१
वाहनं चालक
मंजुर पदे-१
रिक्त पदे-०
भरलेली पद-१
स्पिपर
मंजुर पदे-१
रिक्त पदे १
भरलेली पद-०
एकुण मंजुर पदे-२३
एकुण रिक्त पदे-१०







